रक्तदाता माधव सुवर्णकार यांची नांदेड जिल्हा समन्वयक पदी निवड.
रक्तदाता माधव सुवर्णकार यांची नांदेड जिल्हा समन्वयक पदी निवड.
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,बालाजी सुवर्नाकार,उदगीर : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून सदोदित सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करणारे इटग्याळ (प मू) तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेले माधव एम सुवर्णकार यांची रक्तदान क्षेत्रात त्यांनी त्यांच्या केलेल्या भरी व अमूल्य कामगिरीमुळे त्यांची रक्तदाता समन्वयक समिती नांदेड जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे.
माधव एम सुवर्णकार हे जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाता आहेत बॉम्बे ब्लड ग्रुप हा त्यांचा रक्तगट आहे आजपर्यंत त्यांनी 55 वेळा रक्तदान करून अनेकांची प्राण वाचविण्याची पवित्र कार्य केले असून त्यांनी नांदेड जिल्ह्यासह भारतातील अनेक राज्यात जाऊन त्यांनी रक्तदान केले आहे.
यात श्रीनगर (जेके) विशाखापटनम, झारखंड ,राची ,हैदराबाद ,औरंगाबाद ,नागपूर गोंदिया ,सांगली नांदेड यासह अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भर पावसात जाऊन रक्तदान केले आहे त्यांचे हे कार्य खूप मोठे कौतुकास्पद आहे.
त्यांची नांदेड जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल सोनार समाजातील ऑल इंडिया फेडरेशन चे पदाधिकारी दिलीप महतकर औरंगाबाद येथील पार्श्वगायक अनिल जोजारे चित्रपट निर्माते संजय जाधव , शंतनु सोनार भामरे समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोठी लाठी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील पर्यवेक्षक राजीव आंबेकर , उदगीर येथील श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाचे सहशिक्षक बालाजी सुवर्णकार , दैवज्ञ सोनार एकता संघ पुणेचे अध्यक्ष मधुकर टोम्पे , सचिव नामदेव सुवर्णकार ,
संत नरहरी महाराज सोनार संघ उदगीर चे पदाधिकारी विजयकुमार पेनुरकर , सचिन पोद्दार , सूर्यकांत आंबेकर , राजेंद्र रत्नपारखे , एकनाथ रत्नपारखे , प्रभाकर सुवर्णकार, दामोदर सुवर्णकार , गणेश केजकर , युवक मंडळाचे पदाधिकारी अच्युत पंडित , भागवत पोद्दार, अमोल नखाते , योगेश भोकरे , जनक सुवर्णकार , विनोद पेचफुले , औरंगाबाद येथील डॉ. सौ.छाया सेलिंकर , उदगीर येथील सामजिक कार्यकर्ते तथा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुधाकर दापकेकर , शिक्षक संजय पांचाळ , प्रा. शशिकांत जाधव , राष्ट्रीय ओबीसी युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे ,
जिल्हा परिषद लातूरचे माजी शिक्षक स्वीकृत सदस्य मंगेश सुवर्णकार , सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र च्या संचालिका महानंदा सूवर्णकार , सावित्री बाई सोनार महिला मंडळाच्या पदाधिकारी स्मिता पोद्दार , अर्चना पेनुरकर , सुरेखा केजकर , सारिका सुवर्णकार , भारती रत्नपारखी , उज्वल अंबेकर , उर्मिला रत्नपारखी , शिक्षक विस्तराधिकरी मधुकर सुवर्णकार , शिक्षक कैलास सुवर्णकार , श्रीकांत सुवर्णकार , अहमदपूर येथील राम रत्नपारखी , बबन कूलथे फलटण ,ऋग्वेद (सुवर्णकार) प्रसार वाहिनीचे संपादक दिनेश येवले नागपुर यांच्या सह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून माधव सुवर्णकार यांचे महाराष्ट्रात सोनार समाजाकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत