Breaking News

शेतकऱ्यांना चना खरेदीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन

16 मे शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत



महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड, एफसीआय च्या वतीने जिल्ह्यात चना खरेदीसाठी दि. 1 मार्च 2022 पासून गडचांदूर, राजुरा, चंद्रपूर, वरोरा व चिमूर या खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी सुरु आहे.

चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि. 16 मे 2022 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तरी, ज्या शेतकऱ्यांना आपला चना शासनाच्या दरात नाफेडला विकायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी दि. 16 मे 2022 अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर चना खरेदीसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही.  असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत