अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित
अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित
या शाळेमध्ये वसतिगृहाची सोय केलेली असून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, निवासी व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शाळेत प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप दि.15 एप्रिल ते 31 मे 2022 या कालावधीत तर अर्ज स्वीकृती दि. 10 जून 2022 पर्यंत सुरू राहील.
तरी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी वर्ग 6 तसेच वर्ग 7 ते 10 च्या रिक्त जागेवर प्रवेशासाठी संबंधित शाळेत संपूर्ण तपशिलासह अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत