गडचांदूर ते परमडोली मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
गडचांदूर ते परमडोली मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
राजुरा बांधकाम उपविभागाचे डिप्टी इंजिनिअर बाजारे मालसुतो मध्ये मस्त,
ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करण्यात व्यस्त
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका हा विदर्भाच्या शेवटच्या टोकावर तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात जुने रस्त्ये उकरुन नवीन मजबूत रस्ते बनविण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांची तरतूद करुन रस्त्याचे कामे मंजूर करण्यात आले आणि रस्त्याचे काम पण सुरू झाले.
गडचांदूर -पाटण-जिवती ते परमडोली हा मुख्य रस्ता तेलंगणा राज्यात जाते या रस्त्याचे डांबरीकरण सिमेंट काॅंक्रेट नाल्यांचे , सिमेंट काॅंक्रेट रस्त्याचे काम पुलियाचे काम कलवडचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामा कडे संबंधित बांधकाम उपविभागचे उपविभागीय अभियंता बाजारे माल कमाओ मालसुतो मध्ये मस्त असल्यामुळे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधित कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करण्यात व्यस्त असल्याची चर्चा सुरू आहे.
पावसाळ्याचे हंगाम जवळ येऊन टेकले असल्याने कंत्राटदाराला लवकर काम उरकून घेण्याची घाई झाली असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ओरड सुरू असून या सिमेंट काॅंक्रेट कामावर पाणी टाकण्यात येत नसल्याचे बाब लक्षात आली असून कामावर पाणी न टाकण्याचे पाप लपविण्यासाठी सिमेंट काॅंक्रेट कलवडला माती टाकून बुजवले जात आहे कलवड आणि सिमेंट काॅंक्रेट नालीच्या कामात अगोदर बेड करून २०एम.एम.चा काॅंक्रेट करायचे असुन.बेड न करता बारीक गिट्टीचा बेड करण्यात येत आहे हे बेड सिमेंट पाईप टाकता टाकता बेड फुटून जात आहे.
काही ठिकाणी डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून जुना फुटलेला रस्त्याला उकरुन त्या रस्त्याला दबाई मशिन ने दबाई करून डांबरीकरण करण्याचे काम ईस्टीमेट प्रत मध्ये असल्याचे बोलले जात आहे परंतु तसे न करता जुन्याच फुटलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे ते पण डांबरीकरण इस्टिमेट नुसार होत नसल्याची चर्चा तालुक्यात जनता करत आहे.मुख्य रस्त्याच्या कामावर काम करण्याचे फलक लावण्यात आले नाही त्यामुळे मुख्य रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून होत आहे आणि डांबरीकरण आणि सिमेंट काॅंक्रेट कामाची नियमावलीचा फलक लावण्यात आले नसल्याने रस्त्याच्या कामावर कंत्राटदाराची मनमर्जी चालत असल्याने आणि संबंधित बांधकाम विभागाच्या बाजारे इंजिनिअर मालसुतो माल कमाओ मध्ये मस्त असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बोलले जात आहे.
या मुख्य रस्त्याच्या कामाची माहिती समजून घेण्यासाठी बाजारे इंजिनिअर ला सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना जिवती तालुकाध्यक्ष यांनी मोबाईल वर संपर्क केला आणि रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे माहिती दिली असता मी उद्या येणार आहे आणि मी तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती समजून सांगतो असे बोलले सय्यद शब्बीर जागीरदार हे दुसर्या दिवशी बाजारे इंजिनिअर यांना मोबाईल वर संपर्क साधला असता मी तालुक्यात आले आहे मी एका तासात फोन करतो म्हणून वेळकाढूपणा केले या कामात खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे.
निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करा व डिप्टी इंजिनिअर बाजारे यांच्या संपत्तीची सि.आय.डी मार्फत चौकशी करावी अन्यथा सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना तालुका जिवतीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत