मासलमेटा सोसायटीवर शेतकरी सहकार पॅनलचा झेंडा
मासलमेटा सोसायटीवर शेतकरी सहकार पॅनलचा झेंडा
१२ पैकी बाराही संचालक निर्वाचित
एनटीव्हिजे प्रवर्गाची जागा रिक्त
महा घडामोडी न्यूज विशेष जिल्हा प्रतिनिधी,कालिदास खोब्रागडे,भंडारा : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मासलमेटा तालुका लाखनी नोंदणी क्रमांक १२६९ च्या २०२२ ते २०२७ या कालावधी करिता संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. त्यात शेतकरी सहकार पॅनल आणि सहकार विकास पॅनल ने एकमेका विरोधात निवडणूक लढविली. त्यात शेतकरी सहकार पॅनलचे बाराही संचालक निवडून आले. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गास उमेदवार न मिळाल्याने जागा रिक्त आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मासलमेटा चे कार्यक्षेत्र गावापुरते मर्यादित असून सभासद संख्या १६८ आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ २०२० मध्ये संपला असला तरी कोविड -१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुरुवात केली. नुकतीच मासलमेटा सोसायटीची निवडणूक पार पडली. त्यात शेतकरी सहकार पॅनल आणि सहकार विकास पॅनल परस्पर विरोधात निवडणूक लढले.
त्यात शेतकरी सहकार पॅनलचे धनराज कुंजिलाल पारधिकर, रमेश शामराव पटले, रमेश महीपाल पटले, भाऊराव जयपाल राणे, अनिरुद्ध नागो राणे, भाऊराव रामा पटले, सुदनाम मनिराम चौधरी, अतुल नारायण कांबळे, रतन कोळीराम रामटेके, विलास चांगो तिरपुडे, फुलवंता नागों तिरपुडे, अन्नपूर्णा दीपक हुमने हे बाराही संचालक निवडून आले. धनशक्ती विरुद्ध जन शक्तीचा विजय झाल्याच्या गावात चर्चा होत आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून उमेदवार नसल्यामुळे जागा रिक्त आहे. शेतकरी सहकार पॅनल ला भरघोस यश मिळावे. याकरिता धनराज पटले, रूपलाल पटले, धनराज पारधी, डेव्हिड रहांगडाले, सिहालाल राणे, बिरला गणवीर, मनोज रामटेके, दीपक हुमने, आत्माराम पारधिकर यांनी अथक परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत