आरोग्य मेळाव्यात तपासणी कर्मचाऱ्यांची आणि खर्च पन्नास हजार
आरोग्य मेळाव्यात तपासणी कर्मचाऱ्यांची आणि खर्च पन्नास हजार
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सुरज शहाणे,सेलू : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेलू येथे 20एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा घेण्यात आला होता मात्र येथे विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलेल्या आरोग्य मेळाव्यासाठी 50 हजार रुपये खर्च केलेची बाब वैद्यकीय अधीक्षक यांना सादर केलेल्या माहिती वरून समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त तालुकास्तरावर आरोग्य मेळावा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार वैदयकिय अधिकारी यांच्याकडून एकाच छताखाली सर्वसामान्य नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करावी त्याना औषध उपचारासह हेल्थ आयडी आयुष्यमान भारत कार्ड देणे व विविध योजने बाबत नागरिकांमध्ये जणजागृती करावी असा या आरोग्य मेळाव्याचा हेतू होता.
सेलू येथे हाआरोग्य मेळावा 20एप्रिलरोजी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केला होता. मात्र याबाबत माहिती व प्रसार शहर व ग्रामीण भागात झाला नाही त्यामुळे असं होऊ नये या साठी गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी महिला व बालकल्याण पशुसंवर्धन व पाणीपुरवठा उपअभियंता व पंचायत समिती अस्थपना प्रमुखांना पत्र देऊन सुंदर माझे कार्यालय अंतर्गत सर्व कर्मचारी या आरोग्य मेळाव्यास उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणे अनिवार्य केले.त्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मुळे आरोग्य मेळावा पार पडला.
या मेळाव्यात सहा गर्भपिशवी व काही मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना एक महिना झाला तरी उपचार मिळत नाहीत. उलट या मेळाव्यासाठी 50हजार रुपये निधी खर्च करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. येथील प्र.वैद्यकीय अधीक्षक एस पी चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाना 50हजार रुपये खर्चाचे विवरण सादर केल्यावरून समोर आले आहे. सर्वसामान्यांना या मेळाव्याचा कोणताही फायदा झाला नसताना 50हजार रुपये खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत