रावेर येथील रसलपूर रोड लगत मॉडेल टॉयलेट अस्वच्छ,
पाणी कमतरता या कडे ठेकेदार ठाकूर चे सोईस्कर दुर्लक्ष
डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व रजा कॉलनी रावेर भागातील स्त्रीयांच्या शौचालयांना दरवाजे अजून न पा रावेर ने लावलेले नाहीत
ठेकेदारास मुख्याधिकारी मॅडम मालेगावे यांचे आशीर्वाद
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी दिपक तायडे, जळगांव : रावेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व रजा कॉलनी रावेर येथील शौचालयांना अजूनही ठाकूर नामक ठेकेदार योग्य ते लक्ष द्यायला तयार नाही कारण रावेर शहरातील याच्या देखरेखीखाली असलेल्या शौचालयाची वाईट अवस्था आहे त्यात कोणताही बदल झाला नाही उलट एक दोन शौचालय सोडले तर बाकीच्यांची अवस्था दयनीय आहे या भागातील स्त्रियांना खूपच वाईट परिस्थितून जावे लागत आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर व रजा कॉलनी रावेर येथील शौचालयांना दरवाजेच नाहीत आणि रावेर च्या सीओ मॅडम स्वालिया मालगवे मॅडम या ठेकेदारकडे लक्ष द्यायला तयार नाहीत यामुळे हा ठाकूर ठेकेदार बिनदास्त अस्वच्छता ठेवून जनतेची डोके दुःखी ठरत आहे, याच्यावर जर कारवाई झाली असती तर या माणसाने नक्कीच दचकून राहिला असता व याच्यावर धाक राहिला असता आणि मॅडम आपला ठेका काढून घेईल या भीतीने या ठाकूर ने स्वछता ठेवली असती, परंतु सीओ तारी, त्याला कोण मारी असा प्रकार येथे सुरू आहे आणि मॅडम चे आशीर्वाद या ठेकेदारास मिळत आहेत म्हणूनच मनमानी कारभार या ठेकेदाराने चालवले आहेत.
रसलपूर रोड लगत असलेल्या शौचालयांची पाहणी केली असता त्यांची खूपच बिकट अवस्था दिसून आली तेथिल महिला रहिवाशी या ठेकेदाराच्या बेअक्कलपणा हैराण झाले आहेत कारण येथे पाणी नाही, डबळे नाही,स्वच्छता नाही, दुर्गंधी युक्त वातावरणाने आजार वाढत आहे पण हा ठेकेदार न दरवाजे लावायला तयार ना स्वच्छता करायला तयार उलट स्वछता अभियानाचे धुंडावडे याने पूर्ण उडवून टाकले आहे या भागातील स्त्रिया या ठेकेदाराच्या अश्या बेताल उत्तरांमुळे आणि कृतीमुळे संतप्त झालेल्या आहेत ,परंतु हा ठाकूर कुणालाही घाबरत नाही
दर महिन्याला या शौचालयापासून हा 80 ते 90 हजार रुपये लूटमार करतो पण व्यवस्थित स्वच्छता ठेवत नाही माणूस कामकरी ठेवला आहे असं सांगतो परंतु असे काही तरी प्रत्येक वेळी उडवा उडावीची उत्तरे देऊन टाळाटाळ करून मोकळा होतो. कोणत्याही प्रकारे याचे काम चांगले नाही तरीही याचा ठेका कायम आहे, तर असं का तर याला नगर परिषद रावेर येथील आरोग्य निरीक्षक व मुख्या धिकारी जबाबदार आहेत कारण हे याच्या चुका याला काहीही दंड किंवा बोलणे न करता उलट आम्ही मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर या नियमाने दुर्लक्ष करत आहेत याच कारणाने हा ठेकेदार नागरिकांच्या समस्यांना सोडवत नाही आणि जनतेच्या पैशांची सर्रास लूट हा करत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे
या ठाकूर नामक ठेकेदाराचा ठेका हा रद्द करण्यात यावा व जो ठेकेदार जनतेच्या मागण्या मान्य करून योग्य स्वच्छता ठेवत असेल व योग्य ती काळजी शौचालयांची घेत असेल त्याला नगर पालिका रावेर ने ठेका देण्यास काहीही हरकत नाही आणि या ठाकूर ठेकेदाराने कामचुकार पणा करून शौचालयाच्या कामी जाणून बुजुन दुर्लक्ष केले या कारणास्तव याचे पेमेंट रद्द करण्यात यावे उलट याच्याकडून न पा रावेर ने नुकसान भरपाई व न पा रावेर ची फसवणूक केली, लूटमार केली या कारणास्तव याच्या कडून दंड वसूल करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत