विवरे खुर्द येथे विविध विकास कामांचे उदघाटन
विवरे खुर्द येथे विविध विकास कामांचे उदघाटन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे जळगांव : रावेर तालुक्यातील विवरे खुर्द गावात आज विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. जि.प. बांधकाम विभाग जळगाव १५ वित्त आयोग पंचायत समिती रावेर स्तरातुन कामांचे उदघाटन करण्यात आले. यात गावातील श्रीधर सुकदेव यांचे घराजवळून चौकापर्यंत पेव्हर ब्लोक बसाविणे, तसेच संत निवास केंद्र दुरूस्ती व सुशोभिकरण करणे, उटखेडा रोड भागातील दत्तु बळीराम सावंत ते बळीराम केशव सावंत यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, व उटखेडा रोड भागातील पाण्याच्या टाकीजवळ तार कंपाउंड करणे,
तसेच श्रीआंनद नगरमध्ये गटर बांधकाम करणे असे विविध विकास कामाचे पंस सदस्या सौ.योगिताताई वानखेडे यांचा हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच स्वराताई पाटील, उपसरपंच बाबुराव पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विलास ताठे, ग्रा.पं.सदस्य संदीप पाटील, सुभाष पाटील, रामदास वानखेडे,ग्रा.पंसदस्या.सौ. मनिषा पाचपांडे, पुनम बोंडे,नसीमाबी. शेख सौ.माधुरी पाटील, सुनिल पाटील,दिपक गाढे,ग्रा.वि.अ.अतुल पाटील, ग्रापं कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थीत होते,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत