Breaking News

गणेशपुर येथे हरीराम मेहर यांच्या गोठ्याला व घराला लागली आग

 गणेशपुर येथे हरीराम मेहर यांच्या गोठ्याला व घराला लागली आग

जनसेवक पवन मस्के यांनी घटनास्थळ गाठत केले मदतकार्य

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,भंडारा : शहरापासून जवळच असलेल्या गणेशपुर येथील हरिराम मेहर यांच्या गोठ्याला व घराला अचानक पणे आग लागली. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती गावातील नागरिकांनी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पवन मस्के यांना दिली. जनसेवक पवन मस्के यांनी लागलीच त्याची माहिती अग्निशामक दल, पोलीस विभाग व विद्युत कर्मचाऱ्यांना दिली.

घटनेची माहिती आजूबाजूचे नागरिकांना होताच आग विझविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या व अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. 

आग आटोक्यात येईपर्यंत जनसेवक पवन मस्के हे घटनास्थळी खंबीरपणे उभे राहून त्यांनी मदत कार्य केले हे विशेष. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र हरिराम मेहर यांचे यात मोठे नुकसान झाले आहे. गुराढोरांकरीता ठेवलेली तनस त्यामध्ये जळून खाक झाल्याने गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत