गोमास तस्करी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या
गोमास तस्करी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,रोहिदास उतळे,पुणे : गोवंश सदृश्य पाळीव जनावरांची मालेगाव येथे अवैधरित्या कत्तल करून मांस टेम्पोत भरून मुंबई येथे बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी निघालेल्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी आज पहाटे अटक केली. आरोपींकडून साडेतीन टन वजनाचे मांस, टेम्पो असा साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी अजरुद्दिन जमालुद्दिन शेख (वय २९), अब्दुल नसीम खान (वय ३६, दोघेही राहणार सारा रहिवासी सेवासदन, कुरेशी नगर कुर्ला ईस्ट, कल्याण, जिल्हा ठाणे) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(क ), ९(अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा प्रताप माने (वय २५ , फिर्याद दिली आहे. राहणार नारायणगाव, ता. जुन्नर) यांनीफिर्याद दिली आहे.
या बाबत ताटे म्हणाले आरोपी हे मालेगाव येथून टेम्पो मधून (क्रमांक एम एच ४३ऐ डी ९२४३) गाया व बैलांचे मांस गोवंडी (मुंबई) येथे विक्रीसाठी घेऊन निघाले होते. मिळालेल्या माहितीच्या पोलिसांनीआज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्गावर मांजरवाडी फाटा येथे टेम्पोची तपासणी केली असता साडेतीन टन मांस आढळून आले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून साडेतीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत