Breaking News

आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्य योग् मुद्रा प्रात्यक्षिक

 आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्य योग् मुद्रा प्रात्यक्षिक

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन आणि मार्शल आर्ट अँड स्कूल गेम्स असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने योग मुद्रा मार्गदर्शन कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

शहरातील प्रसिद्ध योग मुद्रा मार्गदर्शक अविनाश लेनगुरे यांनी ज्युबली हायस्कूल मध्ये कराटेचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना "योग मुद्रा" म्हणजे काय? त्याचा मन आणि शरीराशी असलेला संबंध आणि प्राचीन परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मान्यता यावर प्रात्यक्षिक प्रबोधन केले.


योग मुद्रा चा दैनंदिन जीवनात आणि खेळाशी असलेला संबंध त्यांनी  उलघडला. यावेळी मार्शल आर्ट अँड स्कूल गेम्स असोसिएशन चे प्रशिक्षक मास्टर विनोद पुणेकर रक्षण धरणी मातेचे फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कोटकर, श्रेयस शेंडे, मुकेश वाळके, नंदकिशोर बल्लारवार, रश्मी कोटकर, रीदम कोटकर यांचीही उपस्थिती होती.


कराटेच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच झालेल्या अशा प्रकारच्या प्रात्याशिक प्रबोधन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत