वासुंदे येथील प्रगतिशील शेतकरी शंकरराव वाबळे यांचे निधन
वासुंदे येथील प्रगतिशील शेतकरी शंकरराव वाबळे यांचे निधन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : वासुंदे येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व प्रगतिशील शेतकरी शंकरराव गंगाधर वाबळे यांचे बुधवार दि. १५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते. त्यांच्या निधनाने वाबळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. शंकरराव गंगाधर वाबळे हे वासुंदे येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. गावच्या अध्यात्मिक, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग होता. आपल्या मुलांवर त्यांनी योग्य ते संस्कार केले. शांत व सुस्वभावी असलेले शंकरराव वाबळे हे सर्वांन मध्ये प्रिय असं व्यक्तिमत्व होते. शंकरराव गंगाधर वाबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत