हाडगा येथे मोफत नेत्र रोगनिदान शिबिर संपन्न
हाडगा येथे मोफत नेत्र रोगनिदान शिबिर संपन्न
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे,लातूर : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डाॅ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे रूग्णसेवक , आरोग्य दूत मा.मंगेश चिवटे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठवाडा सह समन्वयक सोमनाथ जाधव यांच्या आयोजनातुन, शिवसेना जिल्हा प्रमुख मा.शिवाजीराव माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,अविनाश दादा रेशमे यांच्या विशेष सहकार्याने आज 16/06 2022 या रोजी हाडगा ता.निलंगा जिल्हा लातूर येथे भव्य असे नेत्रतपासणी आरोग्य शिबिर पार पडले.
शिबिराचे उदघाटन शिवसेना निलंगा तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या हस्ते झाले .या शिबिरामध्ये जवळपास 102 रूग्णांची नेत्रतपासणी झाली .व 15 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी तपासणीत निदर्शनास आले.तरि या सर्व पेशंटची शस्त्रक्रिया अगदी अल्प दरामध्ये उदयगिरी लाॅयनस नेत्र रुग्णालय उदगीर येथे पार पडणार आहे.
बाकी रूग्णांना औषधोपचार व काऊनसिलिंग करून पाठवण्यात आले. या शिबिरा साठी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, तालुका संघटक शिवचरण पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वंजरवाडे, महिला संघटक रेखाताई पुजारी, शिवाजी पांढरे, पांढरे मॅडम इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत