कुलरमध्ये वीज प्रवाहित असल्याने विजेचा जबर धक्का ; कुलरने घेतला 22 वर्षीय तरुणीचा जीव
22 वर्षीय तरुणीचा कुलरच्या करंटने मृत्यू
कालिदास खोब्रागडे विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा :- मृत्यू कधी कुठे कसा आणि कोणत्या रुपात येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा घरातच आपली रोजची कामं करत असतानाही अशा काही घटना घडतात, ज्या जीवावर बेततात. घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूच अनेकदा यात मृत्यूचं कारण ठरतात. सध्या अशीच एक घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. पाहूनगाव , तालुका लाखांदूर येथील घटना सकाळच्या सुमारास घरात केरकचरा साफ करीत असताना अनावधानाने चालू कुलरला हात लागल्याने 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना 16 जून रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पाहूनगाव येथे घडली. सुचिता धनपाल चौधरी ( 22 ) पाहुनगाव असे मृतक तरुणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक पाहूनगावं येथील धनपाल चौधरी यांच्या घरी पती पत्नी एक मुलगा आणि मृतक सुचिता नामक 22 वर्षीय मुलगी वस्त्याव्याने राहतात. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे मृतक युवती सकाळी घरातील केरकचरा काढत असताना अचानक चालू कुलरला हात लागला. त्यामुळे सदर युवती जमिनीवर धारातीर्थी कोसळून जखमी झाली . यावेळी, आई वडील घरीच हजर होते.
दरम्यान, सुचिता खाली जमिनीवर धारातीर्थी पडल्याचा आवाज येताच वडिलांनी तत्काळ घरात धाव घेतली. यावेळी सुचिता जमिनीवर पडली होती. त्यामुळे, आईवडिलांनी तिला उपचारासाठी तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालय गाठले. कर्तव्यावरील व्याद्याकिय अधिकाऱ्याने तिला तपासून मृत घोषित केले. ती विवाहयोग्य असल्यामुळे कुटुंबियांकडून वराची चाचपणी सुरू होती अश्यातच तिचा अकाली मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे. लाखांदूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत