Breaking News

विद्युत डीपीजवळ आढळला नरकंकाल

 विद्युत डीपीजवळ आढळला नरकंकाल

के.के. लॉन लाखनी जवळील घटना

पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद

महा घडामोडी न्युज विशेष जिल्हा प्रतिनिधी,कालिदास खोब्रागडे,भंडारा : काही तरी विजेचे सामान चोरी करण्याचे उद्देशाने विद्युत डिपी जवळ आल्याने त्याला विजेचा धक्का(करंट) लागून अनोळखी इसम मृत्यू पावल्याच्या विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शहारे यांच्या फिर्यादी वरून तथा पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे आदेशान्वये लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेची सूचना मनीषा दांडगे उपविभागीय अधिकारी साकोली तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून तपास सापोनि संजय कोरचे करीत आहेत. या घटनेमुळे शहरासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तो अनोळखी इसम कोण ? त्याची ओळख पटण्याची उत्सुकता लागलेली आहे. 

         रोहित्र क्रमांक ४७१९५७८ च्या वितरण पेटीतून(डीस्ट्रिब्युशन बॉक्स) जवळ विद्युत डीपी चे खाली अनोळखी इसमाचा हाडाचा सांगाडा(नरकंकाल) दिसून आल्याने बाह्यस्त्रोत कर्मचारी उमेश सुखदेव आगलावे लाखनी यांचे हस्ते विद्युत पुरवठा तपासून खात्री केली व पंचासमक्ष पंचनामा करून विद्युत डीपीमध्ये विद्युत पुरवठा सुरू असल्याचे दिसून आले. 

प्रेताची पाहणी केल्यावर डोक्याची कवटी, जबडा, अंगावरील तांबड्या रंगाचा शर्ट, शर्ट चे खिश्यात विद्युत स्विच व शर्टमध्ये हाडाचा सापळा तसेच निळ्या रंगाचा जीन्स फुल पँट या वर्णनाचे अनोळखी मृतकाचे खिशामध्ये २ विद्युत स्विच मिळून आले. त्यामुळे अनोळखी मृतकाने काहीतरी विजेचे सामान चोरी करण्याचे उद्देशाने आला व विजेचा धक्का(करंट) लागून मरण पावला. 

असे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शहारे यांच्या फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू(मर्ग) दाखल केला आहे. या घटनेबाबद पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांना विचारणा केली असता सदर अनोळखी इसमाने डीपीचे २ स्विच काढून खिशात ठेवले आणि तिसऱ्यांदा चोरी करण्याचे उद्देशाने डीपी मध्ये हात घातला असता करंट लागला. खाली ओलसर जागा असल्यामुळे मास समोरून जळाला व हाडाचा सांगाडा (नरकंकाल) बाकी उरला. 

मृतदेहावरील संपूर्ण जळल्यामुळे मृतदेहाची वास आली नाही. तसेच डीपीचे खाली खोलगट भाग असल्यामुळे ही घटना वेळीच लक्षात आली नाही. असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे लाखनी शहरासह ग्रामीण भागातही खडबड उडाली आहे. हा अनोळखी इसम कोण ? याचा लाखनी पोलिस शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत