Breaking News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खोपा बर्ड्स फाउंडेशन तर्फे वृक्ष पुनर्वसन मोहीम सुरू

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खोपा बर्ड्स फाउंडेशन तर्फे वृक्ष पुनर्वसन मोहीम सुरू 

महा घडामोडी न्युज नेटवर्क,सांगली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांना पुरस्कार म्हणून मिळालेले बेलाचे छोट्या रोपांचे वृक्षात रूपांतर होऊ लागले होते. 



त्या रोपाला जमीन हवी होती पण अपार्टमेंट संस्कृतीने ते योगेश यांना शक्य होत न्हवते. त्यांना खोपा बर्ड्स यांच्या वृक्ष पुनर्वसन मोहिमेसंदर्भात कळताच. त्यांनी हे पाच फूट कुंडीत वाढलेले बेलाचे झाड संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंगारे यांना दिले. शिंगारे यांनी हे झाड बापट मळा महावीर उद्यान सांगली येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत खुल्या जागेत लावून या मोहिमेची सुरुवात केली.

बऱ्याच वेळा आपल्या अपार्टमेंटमध्ये गॅलरीत कुंडीमध्ये वाढत असलेली देशी झाडे अपुऱ्या जागेमुळे त्याची पूर्ण वाढ होत नाही. तेव्हा अशी मोठी झालेली झाडे जर आपल्याला नको असतील तर ते सकाळी सात ते दहा या वेळेत बापट मळा महावीर उद्यान येथे शिंगारे हर्बल टी येथे आणून द्यावीत आम्ही दत्तक घेऊ व त्याचे खुल्या जागेत पुनर्वसन करू.

सचिन शिंगारे 9421049250

सुनिता शिंगारे 7028504125

योगेश रोकडे 91758 02480

कोळेकर सर 84129 93198

मेघदीप कुदळे 70205 49227

हेमंत खैरमोडे 73509 60801

प्रशांत राजगिरे 90289 44771

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत