विरुर सज्ज देवींच्या निरोपासाठी; महिलांची मोठी उपस्थिती
विरुरात उद्या देवींच्या विसर्जनासाठी उत्साह, महिलांचा मोठा सहभाग; पोलिस प्रशासन सज्ज
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, विरुर : विरुर येथे उद्या १२ शारदादेवी व ३ दुर्गादेवींचे उदयाला विसर्जन एकाच दिवशी पार पडणार असून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. ढोल-ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर निघणाऱ्या मिरवणुकीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग अपेक्षित असून वातावरण अधिक मंगलमय होणार आहे.
मिरवणुकीचा मार्गक्रम असा असेल :
बालाजी चौक येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन तुकडोजी चौक, अहिल्यादेवी चौक, बुद्ध विहार चौक, संत तुकाराम महाराज चौक, बालाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बस स्टँड येथे मिरवणूक पोहोचणार आहे.
एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर विसर्जन होत असल्याने पोलिस प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. मिरवणुकीत कोणताही गालबोट न लागता सोहळा शांततेत पार पडावा यासाठी ठाणेदार संतोष वाकडे यांचे विशेष लक्ष उद्याच्या विसर्जन मिरवणुकीवर राहणार आहे. गावात शिस्त व शांती अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
यावेळी बस स्टँड चौकात ट्रॅक्टर युनियनतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ग्रामस्थांच्या उत्साही सहभागासह, महिलांच्या मोठ्या उपस्थितीमुळे, आणि पोलिस प्रशासनाच्या सतर्क देखरेखीखाली होणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत भक्तीभाव, उत्सवाचा जल्लोष व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडणार आहे.
बातमी संकलन : प्रविण चिडे, विरुर स्टे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत