Breaking News

आंबेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव महावितरणचा अंदाधुंदी कारभार

 आंबेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव महावितरणचा अंदाधुंदी कारभार

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,चंद्रकांत भवारी,आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील पच्छिम पट्टयात भीमाशंकर ते आहुपे ह्या भागात गेली कितेक दिवस लाईट चा लपंडाव चालु आहे, दोन दोन तिन तीन दिवस लाईट नसते तरी महावितरणचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत वारंवार फोन वर अधिकार्यांना तक्रार देऊन सुध्दा या कडे दुर्लक्ष जाते व काही अधिकारी फोन पन उचलत नाहीत तेव्हा ह्या भागातील नागरीक लाईटच्या लंपडावला ञस्त झाले आहेत.

 या भागात पाऊस असल्यामुळे.साप विंचु अन्य कीटक राञी घरात घुसतात त्यापासुन नागरिकांच्या जिवतास धोका आहे, ह्या पासुन .कोना जीवितास धोका झाला तर ह्याला जबाबदार कोन असा सवालही नागरिकांनी केला आहे.ऐन वेळी पावसाळ्यात लाईटचा असाच लपंडाव चालु राहीला तर काही स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत आम्ही महावितरणच्या ऑफिसवर मोर्च्या घेऊन येऊ आसा ईशेरापन नागरिकांनी केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत