Breaking News

रावेर येथे अवैध विद्यार्थी-प्रवासी वाहतूक प्रकरणी 5 रिक्षा चालकांवर कारवाई

 रावेर येथे अवैध विद्यार्थी-प्रवासी वाहतूक प्रकरणी 5 रिक्षा चालकांवर कारवाई

मात्र मध्यप्रदेश येथील बसेस आणि टाटा मॅॅॅजिक या अवैध प्रवासी वाहतूक गाड्यांवर कारवाई का नाही

काय आहे राजकारण

एका ट्रिप चे परमिट असून मात्र तीन फेऱ्या पूर्ण करून एम पी तील गाड्या महाराष्ट्र सरकारचा महसूल उडवत आहेत

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दिपक तायडे, रावेर : चार दिवस अगोदर रावेर पोलिसांनी 5 रिक्षा चालकांवर अवैध प्रवाशी वाहतुकीबाबत कारवाई करून स्पष्ट ताकीद दिली की यापुढे विद्यार्थी कोंबून वाहतूक करू नये ,खरोखरच स्तुत्य उपक्रम रावेर येथिल कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री कैलास नांगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक साहेब, पोलिस ठाणे अंमलदार भागवत धांडे सह मुकेश सोनवणे यांनी केली.



खरंच धोकादायक पद्धतीने विद्यार्थी बसवले होते परंतु रावेर शहरातून व तालुक्यातुन दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून सदर प्रवाशी वाहतुकी कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष रावेर पोलिस करीत आहेत का हे एक राजच आहे असे रावेर मध्ये चर्चेस उधाण आले आहे, याबाबत सविस्तर वृत्त असे की रावेर येथे दिवस भर एम पी तील टाटा मॅजिक गाड्या आणि बसेस( डब्बे) अवैध प्रवाशी वाहतूक मोठया प्रमाणावर करतात ,एका फेरीचे परमिट असते.



 मात्र 3 तीन फेऱ्या रावेर ते बऱ्हाणपूर आणि शेवटची फेरी जळगांव पर्यंत मारून महाराष्ट्र सरकार चा महसूल एमपी तील गाड्या पळवीत आहे असे विचित्र चित्र आहे परंतु या वाहनांवर कारवाई का होत नाही.

याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रावेर मध्ये प्रवाशी मित्र, शासनाचे शुभचिंतक हे करीत आहेत, तरी आशा आहे की या अवैध प्रवाशी वाहतुकीवर रावेर चे पोलिस निरीक्षक कैलास नांगरे साहेब कारवाईच्या सूचना त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना करतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत