राजुरा पोलीस स्टेशनला परखड लिहनाऱ्या पत्रकारांची एलर्जी, पोलीस निरीक्षकांना लांगुलचालन करणाऱ्या पत्रकारांचा विळखा
राजुरा पोलीस स्टेशनला परखड लिहनाऱ्या पत्रकारांची एलर्जी, पोलीस निरीक्षकांना लांगुलचालन करणाऱ्या पत्रकारांचा विळखा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजुरा : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनांचे कौतुक आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून करताना घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींकडे लक्ष वेधने हे देखील माध्यमांचे कर्तव्य असते ,परंतु हल्ली माध्यमानामध्येही काही अश्या घटकानी शिरकाव केलाय जे कायम प्रशासकीय अधिकार्यनाचे लांगुलचालन करताना त्यांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या गैरकृत्याकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करताना दिसतात,
त्यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील अश्या लांगुलचालन करणाऱ्या माध्यमाप्रतिनिचे गोडवे गाताना परखड पने आपली लेखणी चालवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना मात्र कमी लेखण्याचा प्रयत्न करताना दिसतायत असा प्रकार राजुरा पोलीस स्टेशन द्वारे प्रकाशित दक्षता समितीच्या प्रकाशित यादी वरून दिसून येत आहे ,प्रत्येक तालुका व शहर पोलीस स्टेशन मध्ये दक्षता समिती ची स्थापना केली जाते ज्यात समाजातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते ह्यांच्यासोबत माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश केला जातो.
राजुरा पोलीस स्टेशन द्वारे ही अशी समिती घोषित करण्यात आली परंतु ह्यात माध्यम प्रतिनिधींचा समावेश करताना जे पत्रकार दक्षता समितीच्या बैठकीत पोलीस विभागाच्या चूका लक्षात आणून देतात ,विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणतात अश्या माध्यम प्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलल्याचे लक्षात येत असून ह्यात केवळ पोलीस विभागाच्या कारवाईचे गुणगाण गाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचाच समावेश केलेला आहे , हा प्रकार अन्याय कारक असून अनेक माध्यम प्रतिनिधी नि जाहीर निषेध केला असून पोलीस विभागाणी कितीही डावलन्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांच्या चांगल्या कारवाईचे कौतुक करताना त्यांच्या गैरव्यवहार व हेतपुरस्पर केलेल्या चुकीच्या कारवाईचा भांडाफोड ह्यापुढेही न डगमगता करत राहु असा निर्धार व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत