दैनिक नवराष्ट्र च्या प्रतिनिधी विरोधात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल
दैनिक नवराष्ट्रच्या प्रतिनिधी विरोधात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, राजुरा ; राजुरा येथील दैनिक नवराष्ट्र चे प्रतिनिधी सय्यद जाकीर सय्यद नसीम ह्यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्थानकात खंडणी मागणे ,समाजमाध्यमात जाणीवपूर्वक बंदनामी करणे ह्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, प्राप्त माहितीनुसार राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कु,मंगला जनार्दन मेश्राम, रा,रामनगर कॉलोनी राजुरा ह्यांनी भारत चौक राजुरा येथील रहिवासी सय्यद जाकीर ह्यांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून
समाज माध्यमातून त्यांच्या विरोधात हेतुपुरस्पर गैरव्यवहार व बाजार समितीत अनियमितता केल्याचा ठपका ठेवून बदनामीकारक मजकूर प्रकाशित करणे तसेच आपल्याकडे तुमच्या विरोधात गैरव्यवहाराचे पुरावे असल्याची धमकी देऊन पैसे मागीतल्याची तक्रार दाखल केली आहे ,प्राप्त तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सय्यद जाकीर ह्यांच्याविरोधात अप ,क्र,293/2022कलम ,385,501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहे,पोलीस उपनिरीक्षक विजय खोब्रागडे ह्यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रकरणाची चौकशी करत तपसाअंती योग्य कारवाई करण्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे.
मागील काही काळापासून राजुरा शहर व तालुक्यात काही व्यक्तीकडून समाज माध्यमातून सरकारी कर्मचारी व पदस्थ व्यक्तींविरोधात समाज माध्यमांवर बदनामीकारक वृत्त प्रकाशित करून संबंधितांना धमकवण्याच्या प्रकारात वाढ झाली असून तथाकथित गैरव्यवहाराविरोधात कायदेशीर लढाई चे पर्याय खुले असताना केवळ बंदनामी करणे व संबंधितांकडून आर्थिक लाभाची मागणी करण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने संबंधितांची नाहक बदनामी होत असल्याने कर्मचार्यांमध्येही ह्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे ,सदर प्रकरणाच्या चौकशीतून योग्य ते तथ्य बाहेर येतील व ह्या प्रकाराला पायबंद लागेल अशी अपेक्षा जनतेतून व कर्मचार्यांमधून व्यक्त होत आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत