पुलात अडकुन तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
पुलात अडकुन तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
विठ्ठलवाडा येथील घटना
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : आई वडीला सोबत भेटी-गाठी करिता नातेवाइकाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा पुलाखाली अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.१० जुलै रोज रविवारला गोंडपीपरी तालुक्यातील विट्ठलवाडा येथे घडली आहे.
मृतक चिमुकलीचे नाव सानू मंगेश चुनारकर वय ३ वर्ष असून मूल तालुक्यातील चिमडा येथील रहिवाशी होती.गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे तीन दिवसांपूर्वी आली होती .
तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ती आई सोबत विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे थांबली. मुसळधार पावसाने नदी ,नाले ,गावातील नाली ,छोटे पूल पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत अश्यातच रविवारला सकाळी ९.०० वाजताच्या सूमारास घरासमोरील नालीत पाय घसरून पडली नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या पुलात जाऊन अडकली.
घरच्यांनी आरडाओरड करताच तिला वाचविण्यासाठी दोन युवक नालीत उतरले आणि तिला पुलातून बाहेर काढन्याचा प्रयत्न केला त मात्र ती पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली आणि पुला खाली अडकली . दहा ते पंधरा मिनिट चा वेळ निघून गेला मात्र ती चिमुकली पुलाच्या बाहेर न पडल्याने घरच्यांची धाकधूक वाढली.
पुलात बाबूं टाकुन पळताळणी करताच ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूलाच्या बाहेर निघाली मात्र बराच वेळ पुलाखालील पाण्यात अडकून राहील्याने बेशुद्ध पडली. लागलीच गावातील एका ऑटो ने तिला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू ने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत