Breaking News

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता

 जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे, पारणेर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक आतिवृष्टीचे कारण पुढे करुन राज्य शासनाने पुढे ढकलली असुन यामुळे शिक्षणाच्यात मरगळ आली असुन काही हौशी गुरुजीचा ऐन आषाढ महिन्यात चांगलाच हिरमोड झाला आहे,कोरोनाची नैसर्गिक आपती नंतर मोठ्या कालावधी नंतर होऊ घातलेल्या शिक्षक बँकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २४ जुलै २०२२ रोजी होणार होती .परंतु राज्यात अतिवृष्टीचे कारण पुढे आल्याने पुन्हा एकदा ही निवडणूक पुढे ढकलली आहे . शिक्षक बँकेची निवडणूक म्हटले कि मतदान होईपर्यंत मोठी आर्थिक उलाढाल होते .त्याला कारणही अशे आहे कि बँकेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आर्थिक दृष्टीने सक्ष्यम आहेत .म्हणजे सर्व शिक्षकाना तगडे पगार आहेत त्यामुळे बँक ही आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे,

बँकेला नफा मोठा आसतो तर थकबाकी झिरो आसल्याने ज्या त्या गुरुजीला वाटते आपण बँकेचे कारभारी व्हावेत .त्यामुळे प्रत्येक निवडणूकीला मोठी उलाढाल होते तर या काळात मतदार गुरुजीचेही पाचही बोटे तुपात आसतात . कारण निवडणुकीला उभे रहाणारे शिक्षक चांगले पैसावालेच आसतात .म्हणजे जर एक शिक्षक जोडी नोकरीला असेल तर त्या घरात महिन्याला लाख दिड लाख पगार हमखास घरी येतो .त्यामुळे येथे निवडणुकीला उमेदवार तगडे पैसे खर्च करणारेच आसतात .त्यामुळे निवडणूक काळात मोठी आर्थीक उलाढाल होते .तर ओल्या सुक्या पार्ट्या ही रंगतात .परंतु ऐन निवडणूक रंगात येत आसतानच मतदान प्रक्रियच पुढे ढकल्याने सर्व काही जागच्या जागी थांबले व गुरुजीच्या स्वप्ननावर पाणी फिरले , तर ऐन आषाढ महिन्यात गुरुजी तांबड्या पांढऱ्या रस्याला वंचित झालेले दिसत आहे ,

  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या २१ जागासाठी २४ जुलै २०२२ रोजी मतदान होणार होते .यासाठी संपुर्ण जिल्हातुन यासाठी ८५ उमेदवार मैदानात उतरले होते . यासाठी चार प्रमुख मंडळात लढत होणार होती यात प्रामुख्याने सदिच्छा, गुरुकुल, गुरुमाऊली तांबेगट व गुरुमाऊली रोहकले गट व त्याचे सहकारी मंडळे अशी लढत होणार आहे . परंतु निवडणूक पुढे ढकलल्याने सर्वच हिरमुसले . पारनेर तालुक्यातुन पाच उमेदवार निवडणूक रिगणात उतरले होते यासाठी ८६२ शिक्षक मतदार मतदान करणार होते .

   शिक्षक बँकेसाठी शिक्षक मतदार म्हणजे उच्च शिक्षित मतदार आसले तरी या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होत आसते .त्याला कारणही तशेच आहे .मतदारही आर्थिक प्रबळ आहेत . उमेदवार ही खर्च करणारा पाहिजे अशा आग्रह सहकारीच धरत आसतात म्हणजे उमेदवार ही पैसावाला व ज्यासाठी निवडणूक ती कामधेनूही धनलक्ष्मीच आसल्याने येथे पैसाचा चांगलाच धुर निघतो हे जगजाहीर आहे तर याच बँकेच्या सभा किती भव्य दिव्य आसतात त्यात आंडें टमाटोचा कसा पाऊस पडतो फ्रि हिट कशी होते ऐक मेकाचे कपडे कशे फाडली जातात हे उभ्या महाराष्ट्रला परिचित आहे . यात शिक्षक सभासदाचे कपडे धरले जात आसले तरी यात ज्ञान देवतेचे वस्ञ हरण होत आहे हे शिक्षक विसरतात .

  बँकेची निवडणूक पुढे ढकलून सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आसल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे आज रोजी ऐन आषाढ महिन्यात निवडणूक पुढे गेल्याने सभासद ओल्या सुक्या पार्ट्याला मुकले आहेत .तर उमेदवार ही नाराज झाले असुन गेल्या अनेक दिवसापासून तयारी केली होती त्यात काही नी पहिल्यांदाच अधिकृत रजा टाकल्या असतील .आता निवडणूक पुढे गेल्याने पुन्हा बे ऐके बे .बे दुनेचार म्हणण्याची वेळ गुरुजीवर आली आहे . ऐकदरीतच निवडणूक पुढे ढकल्याने गुरुजी चांगलेच हिरमुसले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत