कालव्यात तरूणीचा मृतदेह आढळला
कालव्यात तरूणीचा मृतदेह आढळला
पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, अर्जुनी मोरगाव : इटियाडोह धरणाच्या कालव्यात आज (ता. २८) सकाळीं ९.०० च्या दरम्यान तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला.झालेली घटना हत्या की आत्महत्या याबाबत प्रकरनाच्या तपास व शवविच्छेदन अहवालांनातरच निष्कर्ष काढता येईल,मृतक तरुणीचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालाचा प्राथमिक अंदाज अर्जुनी मोरगाव पोलिसांनी वर्तविला आहे.
सविस्तर वृत्त असे की तारीख 25 जुलै 2022 पासून 22 वर्षीय मृतक तरुणी योगिता शालिकराम जांभुळकर रा.अर्जुनी/मोरगाव ही घरातून निघून गेली होती.कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. याबाबत नातेवाईकांना माहिती दिली मात्र कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. आज अखेरीस डॉ. गाडेकर यांच्या शेताजवळ व पाटबंधारे विभागाच्या कालव्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यामुळे घरातून निघून गेलेली योगिता आणि मिळालेला मृतदेह याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी योगिताच्या कुटुंबीयांना बोलवून ओळखण्यास सांगितलं योगिताच्या कुटुंबीयांनी तिच्या घातलेल्या कपड्यावरून व मृतदेहावरून ही योगिताच असल्याचे सांगितले आणि शहरात एकच खडबड माजली, तरुणीचा मृतदेह ज्या परिस्थितीमध्ये आढळून आला त्यावरून ही आत्महत्या की हत्या अशी शंका नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली.
आज दुपारी ३ च्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीन रूग्नालय अर्जुनी मोरगाव येथे पुर्ण करून कूटूंबियांना मृतदेह सुपूर्दे केला.या प्रकनाचा तपास स.पो.निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या मार्गदशनात सपोनि तागड पो.हवालदार रोशन गोंडाने करीत आहेत.वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.< /p>



कोणत्याही टिप्पण्या नाहीत