जामनेर येथे आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा वर्षावास नियोजन बैठक संपन्न
जामनेर येथे आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा वर्षावास नियोजन बैठक संपन्न
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगाव : दि.10/07/22 रोजी जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेची आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू होत असलेल्या वर्षावास राबविण्या बाबत नियोजित बैठक संबोधी काँम्प्युटर फत्तेपुर या ठिकाणी तालुका अध्यक्ष अशोककिर्ती तथा वसंत लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग आद.सुशिलकुमार हिवाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जेष्ठ मार्गदर्शक- आद.धम्मानंद तथा नामदेवराव तायडे,आयु.एकनाथ लोखंडे (पं.समिती उपसभापती),आयु.पुनाजी शेजवळ(सरपंच फत्तेपुर)* यां मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी बैठकीचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे दिप,धुप पुष्प पुजन केले यानंतर पचांग प्रणाम, त्रिशरण पंचशील ग्रहण करून बैठकीस सुरुवात होण्या अगोदर ज्येष्ठ मार्गदर्शक दिवंगत भानुदास इंगळे गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बैठक सुरू झाली यावेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पदाधिकारी धम्म उपासक यांचे जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष व ता.सरचिटणीस यांनी स्वागत केले तालुका संस्कार सचिव बौद्धाचार्य आद. धम्मदुत तथा दशरथ संध्यान यांनी वर्षावास राबविण्यात येणाऱ्या अडचणी , लोकांचा सहभाग यावर मत मांडले, यानंतर बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आद.सुशिलकुमार हिवाळे वर्षावास कसा राबवावा,
याबाबतचा अनुभव, नियोजन, वर्षावासात दिलेले विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, आद.सरपंच पुनाजी शेजवळ यानीही आपले मनोगत व्यक्त केले बैठकीचे अध्यक्ष आद.वसंतदादा लोखंडे यांनी सर्वांचे मनोगत व्यक्त केल्या नंतर आपल्या तालुक्यात याआधी अनेक गावात एकाच गावात वर्षावास राबविला आहे यावर्षी देखील मागणी प्रमाणे वर्षावास एका गावात तसेच तालुक्यात मागणी नुसार फिरत्या स्वरूपात वर्षावास प्रवचन मालिका राबविण्यात येईल आणि जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा आयोजित वर्षावासा प्रवचन मालिकेचे उद्घाटन आपल्या जवळच असलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक बौद्ध लेणी येथे दि.13 जुलै म्हणजे आषाढ पौर्णिमा (गुरू पौर्णिमा) सकाळी 11:00 वाजता करणार असल्याचे सर्वांच्या वतीने जाहीर केले.
बैठकीचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक ता.महासचिव आद.बौद्धाचार्य नंदबोधी तायडे सर यांनी केले यावेळी संस्थेचे तालुक्यातील पदाधिकारी ता.सचिव संस्कार बौद्धाचार्य माणिकराव लोखंडे फत्तेपुर,बौद्धाचार्य दशरथ संध्यान पिंपरखेडा,तालुका संघटक आयु.पितांबर रनित लोणी,आयु.भगवान ब्राह्मणे लोणी , आयु.सुपडु मेढे मोयखेडा दिगर,माजी श्रामणेर आयु.किसनजी लोखंडे फत्तेपुर, आयु.रतनजी साळवे चिंचोलीपिंप्री, धम्म उपासक आयु.संदिप सुरवाडे जळांद्री,आयु.मोहन सुरवाडे जळांद्री,आयु.धनराज तायडे फत्तेपुर, आयु.अजय साळवे चिंचोलीपिंप्री आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन ता.सचिव संस्कार आद.बौद्धाचार्य माणिकराव लोखंडे यांनी मांडले यानंतर
उपस्थितांना चहा,पाणी तसेच यथेच्छ अल्पोपहार फराळ तायडे परिवाराच्या वतीने ता.सरचिटणीस आद.नंदबोधी तायडे (संबोधी काँम्प्युटर चे संचालक) यांच्या कडून देण्यात आला अतिशय चांगली अशी व्यवस्था तायडे परिवाराने केल्या बद्दल तालुक्याच्या वतीने परिवाराचे आभार व मंगल कामना व्यक्त करुन शेवटी सरणंत्तय घेऊन बैठकीचा समारोप करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत