भारतीय बेरोजगार मोर्चा च्या माध्यमातून वाढत्या बेरोजगारी च्या विरोधामध्ये व अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये देशव्यापी चरण बद्ध आंदोलन
भारतीय बेरोजगार मोर्चा च्या माध्यमातून वाढत्या बेरोजगारी च्या विरोधामध्ये व अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये देशव्यापी चरण बद्ध आंदोलन
तिसरे चरण देशव्यापी रॅली संदर्भामध्ये.
महा घडामोडी न्युज नेटवर्क,पुणे : कोरोणा महामारीमूळे देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, आणी त्यामुळे लाॅकडाऊन मध्ये 13 करोड लोकांच्या नोकर्यां गेल्या आहेत .NCRB च्या रिपोर्टनूसार आज देशामध्ये दररोज 38 बेरोजगार आत्महत्या करीत आहेत ,आणी ह्याच बेरोजगारीला गती देण्यासाठी मोदी सरकारने अग्निपथ योजना आणली आहे .यामुळे बेरोजगारी दर अजुन वाढणार आहे.
या गंभीर बाबीची भारतीय बेरोजगार मोर्चाने गंभीर दखल घेऊन , बेरोजगारीच्या विरोधामध्ये व अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये चरण बद्ध आंदोलनाची घोषणा केली होती , त्याचाच भाग म्हणून 15 जुलै 2022 ला तिसरे चरण देशव्यापी रॅली प्रदर्शन होत आहे, हे रॅली प्रदर्शन देशातील 25 राज्यांमध्ये एकाच दिवशी होत आहे .
भारतीय बेरोजगार मोर्चा ची मागणी आहे कि ज्या नोकर भर्तिवर केंद्र सरकारने अघोषित बंदी घातली आहे , त्याला तात्काळ रद्द करावे .व लवकरात लवकर सर्व विभागातील रिक्त अनुषेश त्वरित भरावा .जो पर्यंत नोकरी मिळत नाही तो पर्यंत बेरोजगारांना बेरोजगार भत्ता प्रदान करावा.काॅंट्रॅक्ट बेस पद्धत रद्द करावी व पुर्वी सारखी कायम स्वरूपी भर्ती प्रक्रिया राबवावी,वयाची मर्यादा समाप्त होण्याच्या अगोदर नोकर भर्ती राबवावी , सर्व नोकर भर्ती मध्ये महिलांना त्यांचा संख्यांच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व द्याव. नवीन अग्निपथ योजना तात्काळ रद्द करावी व पुर्वी प्रमाणे सैना भर्ती राबवावी , इत्यादी मागण्या भारतीय बेरोजगार मोर्चा , महाराष्ट्र राज्य युनिट च्या माध्यमातून सरकारच्या समोर मांडल्या आहेत आणी देशव्यापी होत असलेली रॅली महाराष्ट्र राज्य (पुणे )या ठिकाणी होत आहे तसेच उर्वरित 24 राज्यांमध्ये होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत