Breaking News

जस्ट किचनने स्थानिकांना नोकरीवरून काढले

 जस्ट किचनने स्थानिकांना नोकरीवरून काढले

शिवसेना महिला आघाडीची जस्ट किचनवर धडक

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : एमआयडीसी येथे असलेल्या जस्ट किचन येथे कामावर असलेल्या स्थानिक महिला व युवकांना काढून टाकल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या महिला व युवकांना कामावर पूर्ववत न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कंपनी व्यवस्थापनास सौ. उज्वला नलगे यांनी दिला आहे.

चिंचाळा (एम आय डी सी) येथील जस्ट किचन मध्ये जवळपास ८० कर्मचारी कार्यरत आहेत. यात काही चिंचाळा, वांढरी, खुटाळा, लहुजी नगर येथील महिला व युवक येथे कामावर होते. पण येथे कंपनीने परप्रांतीय मजुरांना घेतले आणि स्थानिक महिला व युवकांना काढून टाकले. या महिला व युवकांनी याची तक्रार ८ जुलै रोजी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे यांच्या कार्यालयात येऊन दिली. तसेच त्यांनी आपली परिस्थिती सांगितली. लगेच सौ. नलगे यांनी महिला व युवकांना घेऊन जस्ट किचन गाठले. तेथील सुपरवायझरला याबाबत विचारणा केली असता यांना काढण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असल्याने यात मी काहीही करू शकत नाही.

 त्यांनी होकार दिल्यास मी यांना कामावर घेईल, असे सांगितले. याबाबत कंपनी व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने १२ जुलैला याबाबत बैठक घेऊ असे सांगितले. मात्र, काल दिनांक १२ जुलैला कंपनीचे अधिकारी कोणीच आले नाही आणि बैठक घेतली नाही.

ज्या महिला व युवकांना काढले. त्यांची परिस्थिती फार बेताची आहे. काही युवक येथे काम करून शिक्षण घेणारे आहेत. नोकरी गेल्याने त्यांच्यावर गंभीर परिस्थिती ओठावली आहे. यामुळे या महिला व युवकांना कामावर पूर्ववत न घेतल्यास शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा कंपनीला दिला आहे.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे, शिवसैनिक व महिला व युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत