काय तो प्राथमिक रुग्णालय जिवती,काय तो बेड वर दोन दोन कुत्रे,आरोग्य विभागाचा सगळ कारभार एकदम ओके...
काय तो प्राथमिक रुग्णालय जिवती,काय तो बेड वर दोन दोन कुत्रे,आरोग्य विभागाचा सगळ कारभार एकदम ओके...
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सध्यास्थितीत पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्वरूप प्राप्त झाले असून आता तर चक्क दवाखान्यामध्ये बेड वर दोन दोन कुत्रे झोपुन असलेले चित्र दिसून येत आहे.
आदिवासी व अतिदुर्गम अशा आदिवासीबहुल प्रदेशातील लोकांच्या स्वास्थ्य विषयक समस्या निकाली निघाव्यात प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळावा याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली मात्र जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची रुग्णाची काळजी घेतली जात नाही कारण रूग्णालयातील बेड वर दोन दोन कुत्रे झोपुन राहतात मात्र वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी शासनाने तालुक्यातील ठिकाणी लाखो रुपये खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी याचे रुग्णालयावर योग्य नियेत्रन नसल्यामुळे कुत्र्यांनी याच गोष्टीचा फायदा घेत तिथे बेड वर झोपण्याच्या कार्यक्रम सुरुवात केली.
आरोग्य केंद्राला चांगले वैद्यकीय अधिकारी मिळावा लोकांना योग्य वैद्यकीय सेवा व सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरिता स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अनेकदा शासनाला पत्र व्यवहार करण्यात आले. अनेकदा निवेदनही देण्यात आले मात्र याचा कोणताही फायदा न झाल्याचे चित्र जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात शेवटी मानवा वरती औषध उपचार करण्याकरिता निर्माण केलेल्या वास्तूचा उपयोग पशुवैद्यकीय दवाखान्यात रुपांतर झालेले चित्र दिसुन येते आहे.
तालुक्यातील अनेक गावातील लोकांच्या आरोग्य विषयक समस्यांची सोविद्यावावी प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभो याकरिता परिसरातील नागरिकांना गडचांदूर व चंद्रपूर या ठिकाणी धाव घ्यावी लागते यापेक्षा दुसरे दुर्भाग्य कोणते सद्यस्थितीत ग्रामिण भागात सर्वत्र स्वाथिच्या रोग सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रत्येकाला योग्य उपचार मिळावे याकरिता शासनाच्या वतीने सचोटीने प्रयत्नाची पराकाष्टा केली जात असताना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उपलब्ध असताना केवळ त्या ठिकाणी बेड वर कुत्रे झोपुन असल्यामुळे रुग्णाचे गौरसोय होत आहे. अशा अनेक समस्या प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे नागरिकांना सतावत असताना आरोग्य केंद्राची समस्या त्वरित निकाली काढल्यास प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे वेगळे हत्यार हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिलेल्या आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत