Breaking News

दूचाकीची उभ्या दुचाकीला धडक

 दूचाकीची उभ्या दुचाकीला धडक 

अपघातात माजी सरपंच मुलासह गंभीर जखमी


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी संतोष मडावी चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई निलज फाट्यावर आपल्या दुचाकीजवळ उभ्या असलेल्या बाप लेकास भरधाव दुचाकीने धडक दिल्याने अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

 8 जुलै ला साडे नऊ च्या दरम्यान रुई येथील माजी सरपंच संजय कार हे मुलगा क्रीष्णा कार सोबत शेतीवरून मोटारपपं सुरू करून आपल्या रुई गावच्या स्टॅन्ड वर आपल्या mh34 aw0488 दुचाकीजवळ उभे होते .दरम्यान भरधाव येणाऱ्या दुचाकी क्रमांक mh34 5150 या दुचाकी चालकाने उभ्या असलेल्या बाप लेकास धडक दिल्याने अपघात झाला.

 अपघात रुई येथील माजी सरपंच संजय कार हे मुलगा कृष्णा कार सह गंभीर जखमी झाले आहेत यांना उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर दुचाकी चालक हे आरमोरी येथील असल्याची प्राप्त माहिती असून दोघांना आरमोरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत