Breaking News

कोरपना ग्रामीण रुग्णालयातील दुरुस्तीचे काम म्हणजे विळ्याचा खीरा बनविणे

 कोरपना ग्रामीण रुग्णालयातील दुरुस्तीचे काम म्हणजे विळ्याचा खीरा बनविणे

मात्र अधिकाऱ्याल्या आपलेच दात आपलेच ओठ म्हणायची वेळ

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : कोरपना ग्रामीण रुग्णाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे सदर काम हे वॉर्ड दुरुस्तीचे असून दरवाजे नवीन बसविणे .वार्डा तील दोन्ही बाजूस जुने मजबूत दरवाजे काढून त्याठिकाणी निकृष्ठ दरवाजे ठेकेदाराणे लावले आहे मात्र तीनही वार्डा च्या भिंती फोडून अर्धवट काम करून काम बंद आहे त्यामुळे याठिकाणी रुग्णाची हाल होत आहे दरवाज्याची रुंदी मोठी आहे व वार्डा ला लागून शोचालंय व बाथरूम आहे दरवाजे नलावल्याने रुग्णांना शोचालयाल जाणे अडचनिचे झाले आहे नवीन लावण्यात आलेले.दारे हे वारा आले तरी निघून जात आहे मुसळधार पाऊस पडत आहे रात्री दिवसा बाहेर खेड्यातील रुग्ण प्रस्तुती महिला उपचारासाठी येत असतात.

 वार्डा मध्ये कुत्रे बसत आहे रात्रीला विषारी किडे साप येतात या बाबीला जबाबदार कोण या दुरुस्तीच्या कामामुळे अधिकारी ,कर्मचारी त्याच बरोबर रुग्ण परीशान असून या ठिकाणी निष्काजी ठेकेदार आपली मनमानी करित आहे त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम अभियंता कारणीभूत आहे. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी या कामाची चौकाशी करून निकृष्ट दर्जाचे काम बंद करून ठेकेदार व अभियंतयावर कार्यवाही करण्याची मागणी रुग्ण व रुग्णां च्या नातेवाईकाडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत