Breaking News

रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात  सावित्रीबाई फुले जयंती साजरी

(महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी) दीपक तायडे, रावेर :-  रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात स्त्री शिक्षणाच्या आदय पुरस्कर्त्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस, रावेर नगरीचे नगराध्यक्ष दारा मो जफर मो. उषाराणी देवगुणे, तहसिलदार रावेर यांचे हस्ते माल्यार्पण करून डॉ. प्रिती सावळे बालरोगतज्ञ रावेर, मा दिलीप कांबळे यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावेर नगरीच्या माजी. उपनगराध्यक्ष संगिता घेटे यांनी केले.

हेही वाचा :- इसापूर शिवारात भरधाव बोलेरो पिकअप ने दिली झाडाला धडक, चार मजुरांचा मृत्यू तर ७ मजूर गंभीर जखमी

 या कार्यक्रमास रावेर नगरीच्या नगरसेवक शारदा चौधरी  कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष कांता बोरा , वर्ष महाजन , रंजना अट्रावलकर  सौ. रजनी जोहरे , सौ चंचल बर्वे,  वृशाली तायडे , अनिता महाजन , संगिता अटकाळे  संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश घेटे , दादाराव कांबळे तलाठी रावेर , सम्यक इंगळे, विलास लहासे, दिलीप तायडे, अनिल घेटे, मयुर गडे, नरेंद्र पाटील , शे अफसर ,शे सईद,  इ व  वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ग्रंथपाल निलेश तायडे, यानी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत