Breaking News

वीज पडून ३ बोकड ठार,नान्होरी येथील घटना

 वीज पडून ३ बोकड ठार,नान्होरी येथील घटना

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा, लाखनी : घरची पाळीव जनावरे चारण्याकरिता गावालगत शेतशिवरात नेले असता अचानक वीज पडून३ बोकड विजेच्या शॉक ने मृत्युमुखी पडल्याची घटना आज दुपारी दीड वाजता च्या सुमारास तालुक्यातील नान्होरी येथे घडली. राजेश इस्तरी मेश्राम वय५५वर्षे रा. नान्होरी, ता. लाखनी असे नुकसान झालेल्या पाशुपालकाचे नाव आहे.

       आज दुपारच्या सुमारास नान्होरी परिसरात मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. यावेळी राजेश मेश्राम या पशुपालकाने आपल्या शेळ्या व बोकड गावालगत असलेल्या गोंडेगाव मार्गावरील शेतशिवरात चारायला नेल्या होत्या. अचानक पावसाचा जोर वाढला व विजांचा कडकडाट सुरू झाला काही कळायच्या आत वीज पडली व एक मोठा व 2लहान बोकड विजेचा शॉक लागून जागीच ठार झाले. 

सदर घटनेची माहिती तलाठी योगीराज डांबरे यांना देण्यात आली. तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा तयार केला. सदर पशुपालकाने अंदाजे१५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राजेश मेश्राम हे अल्प भूधारक शेतकरी असून शेतीसोबत पशुपालन करतात. अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत