पिंपळगाव येथे वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण
पिंपळगाव येथे वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम भंडारा, लाखनी : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र साकोली व जि. प. विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव/सडक,ता. लाखनी चे संयुक्त विद्यमाने वन महोत्सवाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगिता उईके, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य किशोर मडावी, सामाजिक वनीकरणचे वनपाल फुले, प्राचार्य पि. एम. गायधने, उपसरपंच उमेश कमाने,ग्रामपंचायत सदस्य बाळा शिवणकर, धनपाल खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते श्रावण कापगते प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
वनपाल फुले यांनी वन महोत्सव व वनीकरनाचे महत्व पटवून दिले. प्राचार्य गायधने यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे असा संदेश दिला. तर वृक्षारोपण हि काळाची गरज असल्याचे बाळा शिवणकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली तथा विध्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढत पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या. या प्रसंगी गावात अनेक ठिकाणी तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करून वन महोत्सव साजरा करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत