जामगा व काटेजवळगा सोसायटीवर शिवसेनेचा भगवा
जामगा व काटेजवळगा सोसायटीवर शिवसेनेचा भगवा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे, लातूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे , पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे, व मराठवाडा संपर्कप्रमुख खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या मार्गदर्शनाखाली जामगा व काटेजवळगा सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकण्यात आला.
काटेजवळगा सोसायटीचे पॅनल प्रमुख विठ्ठलराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत रकटे यांची चेअरमनपदी, तर प्रल्हाद रेडी यांची वाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. तर आशिष पाटील, वसुधा पाटील, बाबुराव हुगे, बाळू नीला, भालचंद्र जीवना, शोभाबाई बोरोळे, कमलाबाई जागले, विजयकुमार रेड्डी, भानुदास कांबळे, शिवाजी पारेकर इत्यादीची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर मोजे जामगा सोसायटीचे पॅनलप्रमुख देवदास पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर शहापुरे यांची चेअरमनपदी तर सुमन अशोक पवार यांची व्हॉइस चेअरमन पदी निवड करण्यात आली.
मनोज रतन पवार, तानाजी दादाराव पवार, याकूब फैजूसाहेब शेख, सुरेश मारुती भिंगोले, सुमनबाई बाबुराव पवार, गंगाराम मशिदा गायकवाड, बालाजी वामन पवार, मल्लिकार्जुन नागनाथ नामोशे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. मौजे जामगा व काटेजवळगा या दोन्ही सोसायटीवर प्रचंड मताधिक्याने शिवसेनेचा भगवा फडकवण्यात आला. या यशाचे श्रेय निलंगा विधानसभेचे शिवसेनेचे नेतृत्व लिंबन महाराज रेशमे यांना जाते. आज निलंगा येथे शासकीय विश्रामगृह येथे दोन्ही सोसायटीच्या सदस्यांचा निलंगा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, तालुका संघटक शिवचरण पाटील, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील,शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, शहर संघटक हरिभाऊ सगरे,उपशहर प्रमुख माधव नाईकवाडे,संतोष मोघे, शाहूराज फट्टे, यशवंत बसपुरे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख,महिला आघाडी तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी,
शहर प्रमुख दैवता सगर, पांढरे मॅडम, सर्कलप्रमुख मंगला कांबळे, व्यापार आघाडीचे उपजिल्हाप्रमुख उमेश सातपुते, तालुकाप्रमुख प्रसाद मठपती, आडत व्यापारीप्रमुख किशन व्यंकटराव मोरे, शहरप्रमुख जमील शेख, उपशहर प्रमुख स्वप्निल लाटे, अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुख लाईक पाशा शेख, उपतालुकाप्रमुख मेहबूब शेख, शहर प्रमुख बाशा कुरेशी, किरण कानडे,कन्हैया पाटील, नागनाथ बाबळसुरे, अर्जुन नेलवाडे, गोपाळ हिबारे, खंडू सरतापे, गणेश सरतापे, राहुल बिराजदार, बजरंग कांबळे, अनिल आरीकर, शिवाजी पांढरे, शुभम डांगे, आयुब शेख, नामदेव शिरसले इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत