Breaking News

श्री.क्षेत्र भीमाशंकर येथील पोखरी घाटात दरड कोसळून आली रस्तावर

 

श्री.क्षेत्र भीमाशंकर येथील पोखरी घाटात दरड कोसळून आली रस्तावर  

दरड कोसळून रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

पुणे जिल्हातिल श्री.क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या जाणार्या प्रवाशांना सावधानीचा ईशारा

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, चंद्रकांत भवारी, आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील श्री.क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून येथे पावसाळ्यात पुर्ण महाराष्ट्रातून खुप मोठ्या संख्येत भाविक गर्दी करत असतात पण ऐन पावसाळ्यात पावसाचा जोर अचानक वाढल्याने पोखरी घाटात असलेली धोकादायक दरड कोसळून रस्तावर आली,सुदैवाने कोणालाही जीवित हानी किंवा नुकसान झालेले नाही,

पण कोसळलेली दरड रस्त्यावर आल्याने प्रवाशांची मात्र मोठी कोंडी झाली आहे, पोखरी घाट हा भीमाशंकर रस्त्यावर असून त्या घाटात वेडी वाकडी वळने व डोंगर भाग आहे, या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आसुन या भागात प्रतेक वर्षी दरड कोसळण्याचे प्रकार होत आसुन येणार्‍या प्रवाशांनी घाटातून हळुवार गाड्या चालवाव्यायात  स्थानिक पोलीस प्रशासनाने केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत