Breaking News

मुसळधार पावसाने निराधार महिलेचे घर पडून मोठे आर्थिक नुकसान

 मुसळधार पावसाने निराधार महिलेचे घर पडून मोठे आर्थिक नुकसान

महा घडामोडी न्युज नेटवर्क, सावली : सावली येथील प्रभाग क्र.16 येथील रहिवासी असलेल्या येल्लूबाई लिंगा शेरकेवार या महिलेचे राहते घर दि.10 जुले च्या मध्यरात्रीच्या जोरदार पावसामुळे कोसडले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

नगर पंचायत च्या प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिडावा यासाठी अनेकदा अर्ज दाखल केले पण,जागेच्या पट्टा नसल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत,अशे अनेक घर आहेत जे घरकुलाच्या प्रतीक्षेत असून मुसळधार पावसाने कोसडून मोठे नुकसान होत असून,त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई,व जाचक अटी रद्द करून घरकुल देण्याची मागणी माजी ग्रा.प.सद्यश जनार्धन गेडाम यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत