आधुनिक युगात सुद्धा पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न
आधुनिक युगात सुद्धा पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न
डीजे संस्कृतीला फाटा देत डफळीच्या तालावर वाजत गाजत बैलबंडी वर काढली वरात
महा घडामोडी न्युज,संतोष रोकडे,अर्जुनी मोर : आधुनिक युगात तसेच यांत्रिक युगात विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करून बडेजाव केल्याचे अनेक उदाहरणे समोर येतात लग्नकार्यात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून तसेच अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन समाजात मिरविण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
या आधुनिक काळात सुद्धा कुठलाही बडेजाऊ न करता वराची वरात जुन्या काळातील डफडीच्या तालावर तसेच वराची वरात काढण्यासाठी आधुनिक युगातील चार चाकी वाहनाचा उपयोग न करता सजविलेल्या बैल बंडी वर काढून खर्चाला लगाम घालण्याचा आदर्श घातल्याचे उदाहरण अर्जुनी मोर तालुक्यातील खामखुरा या गावी दिनांक 3 जुलै रोजी दृष्टीस पडला
खा मखुरा निवासी गजानन मिसार यांचा मुलगा सचिन तसेच बोंडगाव सूर्बन येथील निवासी विश्वनाथ ठाकरे यांची मुलगी दामिनी यांचा विवाह सोहळा वराच्या निवासस्थानी पार पडला या विवाह सोहळ्या प्रसंगी वर सचिन याची वरात आधुनिक युगातील डीजे संस्कृतीला फाटा देत पारंपारिक डफली च्या तालावर वाजत गाजत वरात काढण्यात आली तसेच कुठल्याही दुचाकी किंवा चार चाकी वाहनाचा वापर न करता बैल बंदी वर वरात काढून एक नवा आदर्श घालून दिला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत