Breaking News

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न

 राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे,लातूर : दिनांक ३जूलै रोजी भारतीय बालरोग संघटना लातूर यांच्यामार्फत उपसंचालक, आरोग्य सेवा यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक लातूर डॉ. हेमंतकुमार बोरसे व अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडले.

 या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे ,बालरोग विभाग प्रमुख विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. शिवप्रकाश मुंदडा, क्षयरोग विभाग प्रमुख विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. रमेश भराटे, एम एम सी ऑब्जरवर डॉ. संजय वारद भारतीय बालरोग संघटना लातूरचे अध्यक्ष डॉ. जितेन जैस्वाल, सचिव डॉ. नितीन येळीकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी उपस्थित होते.

सदरील कार्यशाळेत क्षयरोगाबद्दल इतंभूत माहिती,निदान व उपचार यांच्या बद्दल सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यशाळेत पुणे येथील डॉ. प्रमोद कुलकर्णी तसेच औरंगाबाद येथील डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. निखिल पाठक या तज्ञांनी अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. किरण होळीकर यांनी केली तर सूत्रसंचालन डॉ. असद पठाण, डॉ. शिल्पा दडगे यांनी केले तर डॉ. जितेन जैस्वाल यांनी आभार व्यक्त केले सदरील कार्यशाळेचा जवळपास 200 डॉक्टरांनी लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत