कर्मवीर विद्यालय माढेळी येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
कर्मवीर विद्यालय माढेळी येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय माढेळी येथे येथे शाळा प्रवेशोत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळू भोयर सर , शाळा समिती सदस्य व सरपंच देवेंद्र महाजन ,केंद्र प्रमुख अनिल काळे सर, पालकवर्ग व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
शाळा आरंभ दिनाच्या निमित्ताने शालेय परिसरात पताका लावून व प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. विविध उपक्रमाद्वारे शाळा आरंभ करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकाचे व शालेय गणवेश सरपंच देवेंद्र महाजन , शाळेचे मुख्याध्यापक बाळू भोयर व केंद्रप्रमुख काळे व पालकवर्ग यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाळू भोयर यांनी आपल्या प्रास्ताविककेतून शाळेचा प्रगतीचा आलेख व शंभर टक्के निकाल व विविध शालेय उपक्रमाची माहिती भाषणातून सांगितली.
तसेच सरपंच महाजन यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे मार्गदर्शन केले. तसेच केंद्रप्रमुख काळे यांनी शाळेच्या प्रगती बाबत कौतुक केले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शाळा आरंभ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळा प्रथम प्रारंभ दिनी सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विकास काळे सर यांनी तर आभार गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय शेंडे, अशोक वाघाडे , प्रविण येरमे, कुमरे मॅडम, कवडू कन्हाके, गोपाल आत्राम इत्यादींनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत