सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दिपक तायडे,रावेर : श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत, यावल वनविभाग जळगाव वनमहोत्सव सप्ताह अंतर्गत, वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी श्री शैलेंद्र दखणे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री अजय बावणे साहेब, श्री रविंद्र सोनवणे, श्री अशोक तायडे, तसेच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री राजेंद्र कोल्हे सर, संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ अग्रवाल, सदस्य श्री लखमसी पटेल, श्री प्रदीप मिसर, श्री गोपाल जी दुबे, श्री प्रभाकर बाविस्कर, तसेच शाळेचे व्यवस्थापक श्री विकास पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर शालेय आवारात वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले व प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी एक तरी झाड जगवावे याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद पाटील सर यांनी केले. प्रास्ताविक श्री मोहन बारी सर यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार श्री नितीन पाठक सर यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.अशाप्रकारे कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत