शिधापत्रिका कार्ड धारक यांच्या तक्रारीची दखल घेऊन,तातडीने दूर करण्यात यावी : सुनील वराळ
शिधापत्रिका कार्ड धारक यांच्या तक्रारीची दखल घेऊन,तातडीने दूर करण्यात यावी : सुनील वराळ
निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना केला पत्रव्यवहार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठुबे,अहमदनगर : निघोज सोसायटीचा धान्य वाटपाचा प्रश्न नसून संपूर्ण पारनेर तालुका तथा अहमदनगर जिल्हा या ठिकाणी देखील सतत अन्नधान्य पुरवठा उशिराने होत असल्याने. तालुक्यातील अनेक कार्ड धारकांना तीन महिने झाले, असूनही रेशन वाटप झाले नसल्याची परिस्थिती. रेशन दुकानदारांनी पैसे जमा करूनही पुरवठा विभागाकडून धान्य मिळत नसल्याचे रेशन दुकानदारांकडून सांगण्यात येते.
मागील तीन महिन्यापासून अन्नधान्य ,गरीब कष्टकरी, होतकरू,यांना शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य वेळोवेळी मिळालेच नाही.अखेर हे धान्य गेले कुठे? असा सवाल शिधापत्रिकाधारक यांनी उठवला असून,शिघापत्रिका कार्डधारक वेळोवेळी अन्नधान्य मिळावा अशी मागणी करत असल्याने. कार्डधारक व रेशन दुकानदार यांच्यात वेळोवेळी वादही निर्माण झाले आहेत.शिधापत्रिका कार्ड धारक यांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने दूर करण्यात यावी, यामधून अन्न नागरी पुरवठा विभागाचे कार्य जास्तीत जास्ती लोकाभिमुख असावे.
निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनील वराळ यांच्याकडून सांगण्यात आले.यांनी वारंवार पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार निलेश लंके साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला व आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष पत्रव्यवहार निवासी उपजिल्हाधिकारी संदीपजी निचित साहेब यांच्याकडे केला .यावेळी सेवा सोसायटीचे संचालक, दत्ता लंके, शांताराम लाळगे व संतोष लामखडे उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी संदीपजी निचित साहेबांनी पारनेर तालुक्याचा अन्नधान्य पुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत