आदर्श पत्रकार शरद रसाळ यांच्या देशव्यापी पुरस्काराने पारनेरचा सन्मान वाढला~अविनाश पवार( मनसे नेते)
आदर्श पत्रकार शरद रसाळ यांच्या देशव्यापी पुरस्काराने पारनेरचा सन्मान वाढला~अविनाश पवार( मनसे नेते)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रकार शरद रसाळ यांचे पारनेरमध्ये जोरदार स्वागत
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे,पारनेर : पारनेर तालुक्यातील भोयरे गागंर्डा येथील सर्व सामान्य कुटुंबातील एक अष्टपैलु व्यक्तीमत्व आपले घर सांभाळून शेती वगैरे पाहून सुपा येथे व्यवसाया निमित्ताने आपले ट्रॅक्टरचे गॅरेज टाकुन मेकॅनिकचे काम पाहून सुपा पंचक्रोशीत ट्रॅक्टर दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख निर्माण केली व अंगात असलेल्या कलेच्या माध्यमातून व्यवसाय सांभाळुन लिखानाची असलेली आवड व समाजाशी असलेल्या वास्तव नात्यामुळे समाजातील बारीकसारीक घडामोडी वर असलेली नजर त्या माध्यमातून आपणही काहीतरी करायला हव हा ध्यास घेऊन पत्रकारीतेच्या माध्यमातून
दैनिक नगर सह्याद्री सह प्रभात, आपलं नगर अशा दैनिक वर्तमान पत्रात विविध मुद्यावर स्पष्ट पणे मुद्दा विश्लेषण करून लिखानाच्या माध्यमातून वास्तववादी बोलुन एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे पञकार मा.श्री.शरद रसाळ सर यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा एक आगळी वेगळी ओळख निर्माण करुन इतिहास घडवला आहे. आपल्या कौशल्याने त्यांना गल्फ आॅइल आयडाॅल स्पर्धेमध्ये *देशात पहिला नंबर मिळविला आहे, त्यांनी पारनेर तालुक्याच नाव भारत देशात गाजवले व पारनेर तालुक्याच्या सिरपेचात एक मानाचा तुरा पत्रकार श्री. शरद रसाळ सरांच्या माध्यमातून गौरव पुर्ण रोवला गेला. अशा या अष्ट पैलु संघर्ष योध्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी ह.भ.प.श्री.सुभाष महाराज यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजु शेठ पवार ,यांच्या सह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत