ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!! MSRTC Bharti 2022
ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!! MSRTC Bharti 2022
पाच हजार कंत्राटी चालक भरतीला मंजुरी
महा घडामोडी न्युज नेटवर्क,मुंबई : एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकशेखर चन्ने यांनी मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे.
एलएनजी प्रकल्प रखडलाः डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी एक हजार कोटींचा फायदा होणार होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासन या प्रकल्पावर नसतीच चर्चा झाली.या कामासाठी एका कपनीची नियुक्तीही केली. परंतु त्यासाठी लागणारा खर्च व अन्य मुद्द्यावर या कपनीशी चर्चाच सुरू आहे.
एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आह़े याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.
आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.
एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.
पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़. महामंडळातर्फे एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात गेल्या महिन्यात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. आता जिल्ह्यात आणखी दीडशे कंत्राटी चालकांची भरती होणार.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस जागेवरच उभ्या असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत करण्यासाठी सुरूवातीला ९८ चालकांची भरती केली. यामुळे काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्या. तर आता पुन्हा जळगाव विभागात दीडशे कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर महामंडळातर्फे ग्रामीण भागातीलहीं सेवा सुरू करण्याचे नियोजन असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.
संपतील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आव्हन करूनही, हे कर्मचारी कामावर रुजू होत नसून, आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने बससेवा पुर्वत करण्यासाठी आणखी 150 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
महामंडळातर्फे एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात गेल्या महिन्यात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात जळगाव विभागात ९५ चालकांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचायांना सुरुवातीला एका महिन्याची नियुक्ती देण्यात येत असून, त्यानंतर महामंडळाच्या सुचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी ST महामंडळ निवृत्त वाहकांची नियुक्ती करणार आहे. राज्यात एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करत आहे.
- संपकरी कर्मचाऱ्यांवरून कारवाया मागे घेऊन त्यांना रुजू होण्याचे आवाहन केले जाते.
- त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
- याशिवाय एसटीमध्ये ST आणखी दोन हजार ड्रायव्हर्सही कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहेत.
- दरम्यान, चालंकाची भरती होत असताना कंडक्टर्सचीही कमतरता जाणवत आहे.
- त्यामुळे निवृत्त झालेल्या कंडक्टर्सना पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. पाच महिन्यानंतरही अद्यापही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने धावत नसून, राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. याचाच भाग म्हणून सोलापूर विभागातही ६७ कंत्राटी चालकांची नियुक्ती केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर संपातील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.
- असे असताना राज्यात पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी कामावर न आल्यास एसटीची सेवा अद्यापही थांबली आहे.
- त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
- त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी आणि एसटीच्या फेऱ्या सुरू होण्यासाठी कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
- सोलापूर विभागात एकूण ८० चालकांची भरती केली जाणार असून, यातील सध्या ६७ चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यातून २६० बस धावत असून दररोज ४० लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार
- दररोज ८४ हजार किलोमीटरचा प्रवास
महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, ६७ चालकांची निवड करण्यात आली आहे. यातून एसटीच्या फेऱ्या आणि उत्पन्न वाढणार आहे. – सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शासनात विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. यानंतर संपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात केलेल्या निवेदनानुसार, सेवा समाप्त झालेल्या २०१९ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती दिली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्या १०,२७५ कर्मचाऱ्यांना शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कार्यवाही करून कामावर घेतले जाणार आहे. एसटी संपला पाच महिने उलटत आहेत. अजूनही ५०,३७५ कर्मचारी संपत सहभागी आहेत. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर २० हजारांहून अधिक कर्मचारी विविध कारवाईत अडकेल आहेत. बदली, बडतर्फी, निलंबन, सेवा समाप्ती अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरु!! – ST Mahamandal Bharti 2022
महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या उमेदवारांना एका महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून, महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या कामबंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही, अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने सेवा सुरु करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरु केली असून, जळगाव विभागातही २३ मार्चपासून ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे.
खुशखबर – ST महामंडळात कंत्राटी चालक भरती. 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लवकरच खासगी संस्थेला ठेका देण्यात येणार. एसटी महामंडळाने मोठे पाऊल उचलले असून 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
वाहकांच्या कमतरतेचे काय?
11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे, परंतु वाहकांची नाही. ही वाहकांची कमतरता कशी भरून काढणार, असा प्रश्न आहे. परंतु सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे करणाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वाहतूक सेवा गेले चार महिने कोलमडली आहे. त्यावर उपाय म्ह्णून एसटी महामंडळाने आता कंत्राटी चालक भरती सुरु केली आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून हि भरती सुरु असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २५ जणांची भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी बेरोजगार उमेदवारांकडून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची चाचणी घेऊन मग त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जात आहे.
ST कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चार महिने होत आले आहेत. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी हा संप सुरु आहे. संपला आचार महिने होत आले तरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. पण एसटीची सेवा बंद झाल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी शाळेत, महाविद्यलयात जाऊ शकत नाहीत. शहरी तसेच ग्रामीण या दोन्ही भागात हा त्रास होत आहे.
दरम्यान एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन, नोटिसा, निलंबन असे सारे मार्ग अवलंबून पाहिले पण कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाकडून राज्यस्तरावर खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून हि प्रक्रिया राबविली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चालकांची २५ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यांनतर चालक पदासाठी अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती. यामध्ये बेरोजगार उमेदवारांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची संख्या अधिक होती. कंत्राटी पद्धतीने करार करत हे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत. या उमेदवारांची चाचणी रविवारी कणकवलीच्या मुडेश्वर मैदानावर घेण्यात आली. चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांनतर त्यांची प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरु होणार आहे. चालक भरतीत शिक्षण आणि वयाची अट मात्र शिथिल करण्यात आली आहे.
आनंदाची बातमी म्हणजे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC) महामंडळाने १० हजार चालकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. संपाचा पेच कायम असताना उच्च न्यायालयातून वारंवार तारखा मिळत असल्याने प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. संपकरी कर्मचाऱ्यांपैकी १० मार्च अखेर ३० हजार ११२ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारसीमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. या अहवालाचा आधार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाई मागे घेण्यास तयार असल्याचे सांगत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद वाढत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.
कामावर रुजू होणाऱ्यामध्ये प्रशासकीय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश अधिक आहे. चालक वाहकांची संख्या कमी आहे. टप्याटप्याने १० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, यापैकी जवळपास दोन हजार चालकांची भरती झाली आहे. या चालकांच्या मदतीने राज्यात चार हजार गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या असून, त्यांच्या मदतीने १३ हजार फेऱ्या धावल्या आहेत, असा दावा एसटी महामंडळाचा आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील ९२ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यातील ३० हजार ११२ कर्मचारी कामावर रुजू झाले असून अद्याप ५१ हजार ५७१ कर्मचारी संपावर ठाम आहेत. ११,२४३ कर्मचारी निलंबित असून १०,२४९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेले आहेत. देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळात महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
एसटीत कंत्राटी चालकांची भरती; प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचा निर्णय. सद्य:स्थितीत राज्यातील बहुतांशी आगारांत कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर झाले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने ३८ कंत्राटी चालकांची भरती केली असून, अजून १२ चालकांची भरती करणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे.
या कारवाईमुळे आगारांतील ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले.त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काही अंशी पूर्वपदावर येऊ लागली.मात्र, कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक व वाहकांची संख्या अल्प प्रमाणात आहे.साताऱ्यातील ११ आगारांमध्ये केवळ २० ते २२ टक्के चालक व वाहक हजर असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येताना खोळंबा होत आहे.अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालये, नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळ प्रशासनाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सद्य:स्थितीत ३८ चालकांची भरती केली आहे. तसेच भरतीची प्रक्रिया सुरू असून अजून १२ चालक भरले जाणार आहेत. जिल्ह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू नसल्याने कंत्राटी भरती केली जात आहे. - ज्योती गायकवाड, वाहतूक अधिकारी, एसटी विभाग
सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने 50 कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी मागील तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. कर्मचारी संघटना व परिवहनमंत्र्यांनी तीन बैठका घेऊन सुमारे 41 टक्के पगारवाढ केली. तरीदेखील कर्मचाऱयांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहात संप सुरूच ठेवला. त्यानंतर महामंडळ प्रशासनाने कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले. या कारवाईमुळे आगारांतील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काहीअंशी पूर्वपदावर येऊ लागली आहे.
जिह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱया सुरू नाहीत. त्यामुळे कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. याबाबत कंत्राटी कर्मचाऱयांच्या ठेकेदारांशी चर्चा झाली असून, लवकरच कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून जिह्यात फेऱयांची संख्या वाढून प्रवाशांची गैरसोय दूर केली जाणार आहे, असे वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत