नांदा फाटा येथे तान्हा पोळा उत्सवात साजरा
नांदा फाटा येथे तान्हा पोळा उत्सवात साजरा..
जय शिवशंकर युवक मंडळाचे आयोजन.
महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : दोन वर्षानंतर कोरोना सुटका घेत. सर्वत्र तान्हा पोळा साजरा झाला. नांदा येथे देखील नेहमी प्रमाणे जय शिव शंकर मंडळाचा वतीने तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षा नंतर तान्हा पोळा साजरा होत असल्याने लाहनग्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. आपला नंदीत सौंदर्यात भर घालून सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न अनेक स्पर्धकांनी केला.
यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच श्यामसुंदर राऊत, पोलीस पाटील वैशाली भोयर, तमुस अध्यक्ष रामदास पानघाटे, माजी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, लहुजी गोंढे, उपस्थित होते.उत्कृष्ट माती नंदी बैल विशेष पुरस्कार प्रणय गिलबिले, प्रथम पुरस्कार भार्गवी बांधुरकर, द्वितीय पुरस्कार ध्रुव गोंडे, तर तृतीय पुरस्कार विष्णू भलमे यांनी पटकावला.
उत्कृष्ट लाकडी नंदी बैल विशेष पुरस्कार त्रिशा मसाडे, प्रथम पुरस्कार कुशाग्र कुरसंगे, द्वितीय पुरस्कार निरव कामटकर, तर तृतीय पुरस्कार सार्थक खोके यांनी पटकावला. प्रोत्साहन पर पारितोषिक म्हणून निरव टेकाम, निर्विका बोढाले, कैवल्य भोयर, आराध्या बोंडे, गुंजन विरुडकर, अभीर खिरटकर यांना देण्यात आले.
प्रसंगी माती बैलाचे परीक्षण, प्रकाश राऊत, प्रमोद वाघाडे, पुरुषोत्तम निब्रड, तर लाकडी बैलाचे परिक्षण नवनाथ अतकारे, रत्नाकर चटप, प्रशांत नवले यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन नितेश मालेकर तर प्रस्ताविक गणेश जेणेकर यांनी केले आभार युवक मंडळाचे अध्यक्ष नंदू भोयर यांनी मानले. तान्हा पोळा कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी जय शिव शंकर मंडळाचा सदस्यांनी परिश्रम घेतले. गावातील बहुसंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत