जिवीत हानी झालेल्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबाना वार्यावर सोडु नका~ शर्मिलाताई ठाकरे
जिवीत हानी झालेल्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबाना वार्यावर सोडु नका~ शर्मिलाताई ठाकरे
कायद्याची भाषा कळत नसेल तर आपल्या भाषेत उत्तर द्या आपण कोर्टात जाऊ ~ शर्मिला ताई राज साहेब ठाकरे
शिवतीर्थच्या पायरीवर नतमस्तक होऊन आम्ही धन्य झालो~ अविनाश पवार ,मनसे उपाध्यक्ष पारनेर
नगर~पुणे महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातांच्या गंभीर प्रश्नावर पारनेर मनसेचे नेते अविनाश पवार यांनी सहकाऱ्यांसह थेट शिवतीर्थ गाठले. राजसाहेब दौऱ्यावर असल्यामुळे शर्मिलाताई यांनी पारनेर तालुक्यातील सर्व विषयांवर चर्चा करत जनतेच्या प्रश्नावर तुम्ही लढत रहा तुमच्या पाठीशी संपुर्ण पक्ष उभा करू असा आशिर्वाद मिळाल्याने नवी उर्जा प्राप्त झाली आहे त्यामुळे पारनेरचे मनसैनिक नव्या ताकदीने लढ्यासाठी सज्ज झाले आहेत.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे, पारनेर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने करत असलेले तालुक्यातील कामे अहवाल तसेच नगर- पुणे महामार्गावर एक महिन्या पासुन सुरु असलेल्या अपघातात व सार्वजनिक बांधकाम विभागाचे व चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका यांचे दुर्लक्ष, कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना चाललेली टोलवसुली तसेच सुपा एमआयडीसी मध्ये कामगारांच्या समस्या,शेतकरी समस्या, शालेय विद्यार्थी समस्या, प्रशासकीय कामातील अडथळे, अडचणी अशा पारनेर तालुक्यातील विविध विषयांवरील अहवाल मुंबई येथे शिवतीर्थ या ठिकाणी सौ.शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे,
नेते अमित राजसाहेब ठाकरे , नेते अनिल शिदोरे , नेते अविनाश अभ्यंकर ,पक्ष प्रवक्ते संदिप देशपांडे , मनसे महाराष्ट्र राज्य सचिव सचिन मोरे ,माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अरविंद गावडे ,सहकार सेना सरचिटणीस अनिल चितळे , सहकार सेना महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष डी.एन.साबळे ,जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ , नितीन म्हस्के सहकार सेना जिल्हा अध्यक्ष, अविनाश पवार पारनेर तालुका उपाध्यक्ष, यांच्या उपस्थितीत मुंबई शिवतीर्थ या ठिकाणी ही बैठक पार पडली.
सौ. शर्मिला राज साहेब ठाकरे, वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आले की जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेही कमी पडणार नाही. गरज भासली तर कायदेशीर मार्गाने अथवा खळखट्याक मार्गाने जनतेच्या सेवेसाठी सदैव प्रयत्न करत राहा व कुठे गरज पडली तर पुर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे असे आश्वासीत करण्यात असे मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत