Breaking News

कंत्राटदार संगेश भाऊ पावडे यांनी केला एक हात मदतीचा पुढे

 कंत्राटदार संगेश भाऊ पावडे यांनी केला एक हात मदतीचा पुढे

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : दिनांक 12/8/2022 ला ग्रामपंचायत चुनाळा येथील विद्यमान सदस्य राजू मारुती किनेकर यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे संगेश भाऊ पावडे राहणार विरूर स्टेशन यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांचे सात्वन करून त्यांना एक छोटीशी मदत म्हणून संगेश भाऊ पावडे यांनी त्यांच्या परिवारास धनादेश दिला संगेश भाऊ पावडे यांनी कंत्राटदाराचा व्यवसाय जोपासून सुद्धा नेहमी समाजकार्यात अग्रेसर असताना पाहावयास मिळत आहे.

 प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांची सहकार्याची भूमिका असते त्यांना राजू किनेकर यांचे निधन झाले कळताच त्यांनी चूनाला येथे येऊन त्यांच्या परिवाराशी बोलताना राजू भाऊ एक साधा भोळा माणूस जांच्याकडे कोणतीही धनशक्ती नसून सुद्धा आपल्या परिवाराला चांगल्या प्रकारे साभाडून घेणारे राजू भाऊ हरपला असे दुःख व्यक्त केले तसेच सरपंच बाळणात वडस्कर यांनी सुद्धा राजू भाऊच्या निधनाने त्यांच्या परिवाराच्या दुःखात सुद्धा आपण सहभाग घेऊन त्यांचा परिवारास एकनिष्ठेने त्यांच्या सोबत राहून त्यांचे मनोबल वाढेल असे त्यांना आधार देऊ इतकेच बोलून त्यांच्या परिवाराचे राहत्या घरी भेट देऊन सात्वन करताना सरपंच बळणाथ वडस्कर.रविंद्र गायकवाड. ग्राम पंचायत सदस्य. संगेश पावडे. कंत्राटदार माजी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर निमकर. व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत