काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा : शिवाणीताई वड्डेट्टीवार
काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा : शिवाणीताई वड्डेट्टीवार
युवक कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त भव्य मशाल रॅली
रॅलीला युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद चंद्रपूर.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस पक्षाच्या थोर नेत्यांचे मोठे योगदान आहे. कॉंग्रेसच्या कॉर्यकत्यांना कुणीही देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. आज देशात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. यावर्षी आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. तेव्हा कॉंग्रेसची सर्वधर्म समभावाची शिकवणच या देशाला एकसंघ ठेवू शकते. युवक युवतींनी युवक काँग्रेसची मशाल बळकट करावी, मै लड़की हूँ लड सकती हूँ.. हाच संकल्प करून तरुणाईने काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवावा, असे आवाहन यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी केले.
भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त लड़की हूँ लड़ सकती हूँ. या अभियानांतर्गत भव्य मशाल रॅली काढण्याचे आदेश महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिले होते. याचाच एक भाग म्हणून युवक कॉंग्रेसचे चंद्रपूर शहर व जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्वात वतीने ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्थानिक गांधी चौक, चंद्रपूर येथून भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसच्या युवक युवतींना मार्गदर्शन करताना शिवानीताई वडेट्टीवार बोलत होत्या. पुढे शिवानीताई वडेट्टीवार म्हणाल्या की, देशात सध्या सांप्रदायिक तणाव, द्वेषभावनेतून सुडाचे राजकारण सुरू आहे.
जीएसटीच्या माध्यमातून सामान्य नागरिक महागाईच्या खाईत लोटल्या गेला आहे. जिल्ह्याला तीन वेळा पुराचा तडाखा बसला आहे. तेव्हा अशा सर्व पूरपिडीत, शेतकरी, शेतमजूर व शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी युथ कॉंग्रेसने समोर येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, तर प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे विदर्भ प्रभारी प्रदीप सिंधव आणि चंद्रपूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या प्रभारी नेहा निकोसे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मशाल रॅलीची सुरूवात करण्यात आली. मुख्य मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. दरम्यान जोरदार पावसात देखील युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जोश तसूभरही कमी झाला नाही. देशभक्तीचा नारे देत मशाल रॅली बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीला युवक युवतींचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
युथ कॉंग्रेसच्या शाखेचे उद्धघाटन :
रयतवारी प्रभागात तसेच रयतवारी प्रभाग (चंद्रपूर) येथे प्रभाग माझा, शाखा माझी.. या उपक्रमाअंतर्गत माजी नगरसेवक तथा आयोजक राजेश अडूर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सह प्रभारी प्रदीप सिंधव यांच्या हस्ते भारतीय युवक कॉंग्रेसचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पदाधिकारी शिवा राव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव, यूवा नेता सचिन कत्याल, महेन्द्र अडूर, प्रदेश युवक कांग्रेस महासचिव प्रणीत जांभूले, स्वाइश वरजुरकर, पंकज सावरकर, कुणाल चाहरे, नगरसेविका ललिता रेवेलीवार, कु. मीनल रखुंडे,
काजल रोहणकर, दर्शना राकुंडे, कुशी राऊत, माधुरी राजुरकर शहर जिल्हा युवक कांग्रेस उपाध्यक्ष भनेश जंगम, रमीज शेख, सूरज कन्नूर, विनोद वाघमारे बीबी, तौफिक शेख, राजेश नक्कावार बल्लापुर विधान सभा उपाध्यक्ष, शहर जिल्हा युवक कांग्रेस महासचिव, अजय चिनुवार, तेजस दवे, शुभम किते, प्रवीण वडलुरी, प्रकाश देशव्रतार, स्वप्निल चिवंडे, श्रीकांत अडूर, अजय कलवल शाखा अध्यक्ष, रय्यतवारी कॉलरी डिस्पेंसरी चौक हीरा यादव, प्रेम कैतल, प्रदीप वर्मा आदींची उपस्थिती होती..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत