चिमूर, वाघनखांची विक्री करणारा आरोपी अटकेत
चिमूर, वाघनखांची विक्री करणारा आरोपी अटकेत
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,राजू शर्मा, चिमूर : वाघाची शिकार करायची आणि त्याच्या वेगवेगळ्या अवयवांची विक्री करून भरघोष पैसा कमवायचा असा सध्या शार्टकर्ट मार्ग निवडल्या जात आहे. असाच एका प्रकार चिमूर येथील बिअरबारमध्ये उघडकीस आला आहे. वाघाचे नख विकणाऱ्या एका आरोपीला नखांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. जसबिरसिंग संगतसिंग अंधेरेले असे आरोपी नाव असून तो चिमूर तालुक्यातील रा. केसलापुर येथील रहिवासी आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी चिमूर येथील तृप्ती बार अॅण्ड रेस्टॉरंट मध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास एक आरोपी वाघाचे नखे विकण्याच्या उदेश्याने पोहचला होता. अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. सहायक वनसंरक्षक अभिजित वायकोस, वनपरिक्षेत्राधिकारी के. डब्लू, धानकुटे, क्षेत्र सहायक के. बी. गुरनुले खडसंगी व निमढेला येथील वनकर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे बिअरबार समोर सापळा रचला होता.
नखे आरोपी संगतसिंग अंधेरेले रा. केसलापूर नखांसह विक्री करताना रंगेहात अटक केली आहे. आरोपींवर वनगुन्हा नोंदवून भारतीय वन अधिनियम 1972 चे कलम 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही ताडोबा अंधारी प्रकल्पाचे उपसंचालक जी. गुरूप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या आरोपीने वाघाचे नखे कुठून आणली ?, वाघाची शिकार केली का ? अन्य आरोपींचा सहभाग आहे का ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी कसून चौकशी करीत आहेत. चिमूर तालुक्याला लागूनच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्याने वाघाच्या शिकारीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत