Breaking News

विरुर स्टेशन येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजुरा येथे जेलभरो आंदोलनात नोंदवला सहभाग

 विरुर स्टेशन येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजुरा येथे जेलभरो आंदोलनात नोंदवला सहभाग 

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे,विरूर : माननीय प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार आणि माननीय आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे मार्गदर्शनाखाली वाढती महागाई बेरोजगारी अग्निपथ योजना व जीवन आवश्यक वस्तूवरील केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे पेट्रोल डिझेल घरगुती गॅस चे वाढलेले दर आणि जीवनाशक वस्तूवरील वाढलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे,

 या सर्व विषयासंदर्भात विरोध करण्यासाठी आमदार सुभाष भाऊ धोटे सोबत जेलभरो आंदोलनात सहभागी होण्याकरिता विरुर स्टेशन येथील सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम राजू इग्रपवार रविंद्र कुळमेथें रुपाली ताकसांडे अजय रेड्डी आक्केवार साहेब अजित सिंग टाक रामभाऊ ढोमणे इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते जेलभरो आंदोलनात सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत