पारनेर शहरातील बुगेवाडी येथे दोन शाळा खोल्यांचे लोकार्पन संपन्न !
पारनेर शहरातील बुगेवाडी येथे दोन शाळा खोल्यांचे लोकार्पन संपन्न !
मा.नगरसेवीका विजेता सोबले व सुभाष शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश !
पाठपुराव्याचे आमच्याकडे सर्व पुरावे असतानाही विरोधकांचे श्रेय घेण्यासाठी व्यर्थ खटाटोप !श्री.विलास सोबले
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठूबे, पारनेर : पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील बुगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाल्याकारणाने नगरपंचायतचे मा. नगरसेविका सौ.विजेता विलास सोबले व विद्यमान नगरसेवकपती श्री.सुभाष शिंदे त्यांनी पाठपुरावा करत चिमुकल्यांना आयुष्यातील प्राथमिक शिक्षणाची बाराखडी उघड्यावर गिरवण्याची वेळ आली होती . जिल्हा परिषद येथे जि. प . सदस्या सौ.राणीताई निलेश लंके व प्रताप पाटील शेळके यांच्या माध्यमातून बुगेवाडी येथे शाळा खोल्या होव्यात म्हणून पाठपुरावा केला होता .व अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले व जिल्हा नियोजन अंतर्गत 19 लक्ष 25 हजार रुपये किमतीचा निधी उपलब्ध करत या शाळा खोल्या पूर्णत्वास आल्या.
आठ ऑगस्ट रोजी पारनेर शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ व या शाळा खोल्यांचे लोकार्पण सोहळा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते पार पडला.बुगेवाडी जि.प.प्राथमिक शाळा खोल्या लोकार्पन निलेशजी लंके साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष.मा.श्री.विजय सदाशिव औटी होते तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.अर्जंनशेठ भालेकर नगरसेवक श्री.अशोकराव चेडे , श्री.राहुल झावरे सरपंच वनकुटे डॉ.कावरे,
डॉ.सचिन औटी,श्री.विजय भा. औटी,श्री.बाळासाहेब नगरे,श्री.बाळासाहेब मते(सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थ उद्योजक दादाभाऊ कावरे,श्री.बाबाजी बुगे (मा.ग्रा.पं.सदस्य ) श्री.रामदास वाळुंज,श्री.भाऊसाहेब बाबाजी कावरे , श्री.कोडीभाऊ थोरात , श्री.विठ्ठलशेठ कावरे ,श्री.यादव बुगे श्री.सोपान बुगे,श्री.मंगेश कावरे ,श्री.धनंजय थोरात,श्री.बाबाजी बुगे , श्री.बुगे मिस्तरी,श्री.बबन थोरात,श्री.मार्तंड थोरात , श्री.सचिन बुगे , श्री.अशोक सुर्यवंशी सर , श्री.विनायक शिंदे , श्री.भाऊसाहेब कावरे मेजर,श्री.प्रविन कावरे , श्री.विठ्ठल शिंदे,श्री.नवनाथ बुगे , श्री.मुकुंद शिंदे , श्री . बापु बुगे यांच्या सह पालक व पारनेर शहरवासीय मोठ्या संखेने उपस्तित होते .
यावेळी बुगेवाडी ग्रामस्थांनी शाळेला सौरक्षण भिंत व श्रीराम मंदिर सभामंडपाची मागणी आ.लंके यांच्या कडे केली आसता आमदार निलेशजी लंके यांनी लवकरच सर्व प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द या वेळी दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.दगडु कावरे ( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ) यांनी केले व श्री .विलास सोबले. श्री.सुभाष शिंदे व शिक्षीका सौ.मिनल काकडे , सौ.गावडे यांनी आभार मानले .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुगेवाडी येथील शाळा खोल्यांबाबत आमदार.निलेशजी लंके सौ.राणीताई लंके तसेच जि.प.उपाध्यक्ष श्री.प्रताप (पाटील) शेळके यांना पाठपुरावा केला, व पहीली १ व नंतर १ आशा दोन खोल्या १९ लक्ष २५ हजार मंजुर करुन घेतल्या. श्री.विलास सोबले व श्री.सुभाष शिंदे यांनी दोन वर्ष कागद पत्राची पुर्तता जिल्हा परिषदेकडे केली होती,त्याचे सर्व पुरावे व पोहच आमचे कडे आहे पण ज्यांना बुगेवाडीच माहीत नाही व काहींना प्रभाग क्र .४ मध्ये एक वर्षात साधी बंद पडलेल्या लाईट चालु करता आल्या नाही व उन्हाळ्यात जनतेला पाणी पाजता आले नाही आशा नेत्यांनी श्रेयवादासाठी भुमिपूजनाची फार घाई केली.या शाळा खोल्यांचे संपूर्ण श्रेय पाठपुरावा करणारे विलास सोबले व सुभाष शिंदे यांच्यासह प्रतापराव पाटील शेळके व जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई लंके यांचेच आहे. : श्री.दगडू कावरे,उपशहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पारनेर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत